Opposition Leaders on Ram Mandir Inauguration Saam Tv
देश विदेश

PM मोदी करत होते श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, त्यावेळी 5 दिग्गज विरोधी पक्षनेते काय करत होते?

Opposition Leaders on Ram Mandir Inauguration: पंतप्रधान नरेंद्र मोदी श्री रामजन्मभूमी मंदिरात प्राणप्रतिष्ठा विधी करताना असताना त्यावेळी मुख्य विरोधी पक्षनेते काय करत होते? हे जाणून घेऊ

Satish Kengar

Opposition Leaders on Ram Mandir Inauguration:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिरात प्राणप्रतिष्ठा विधीनंतर राम लल्लाच्या प्रतिमेचे अनावरण केले. हा ऐतिहासिक क्षण लाखो लोकांनी त्यांच्या घरात आणि देशभरातील मंदिरांमध्ये टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहिला. अभिषेक सोहळ्यादरम्यान लष्कराने हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टीही केली.

या कार्यक्रमात सेलिब्रिटींसह 10,000 हून अधिक लोक सहभागी झाले होते. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टनेही मंदिर उद्घाटन कार्यक्रमासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित केले होते. मात्र त्यांचे आधीच नियोजित कार्यक्रम असल्याने ते या सोहळ्याला अनुपस्थित होते. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी श्री रामजन्मभूमी मंदिरात प्राणप्रतिष्ठा विधी करताना असताना त्यावेळी मुख्य विरोधी पक्षनेते काय करत होते? हे जाणून घेऊ..   ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उद्धव ठाकरे

श्री रामजन्मभूमी मंदिरात प्राणप्रतिष्ठा विधी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात पूजा आणि गोदावरी नदीच्या काठावर महाआरती केली. यानंतर मंगळवारी ते पक्षाच्या एकदिवसीय परिषदेत सहभागी होणार आहेत. राम मंदिर अभिषेक सोहळ्यासाठी उद्धव ठाकरेंना स्पीड पोस्टने निमंत्रण पाठवण्यात आलं होतं. (Latest Marathi News)

राहुल गांधी

काँग्रेस खासदार राहुल गांधी सध्या भारत जोडो न्याय यात्रेवर आहेत. ते आसाममध्ये आहे. राहुल गांधी आज 15 व्या शतकातील समाजसुधारक श्रीमंत शंकरदेव यांच्या जन्मस्थान बटादरवा ठाण्याला भेट देणार होते. मात्र त्यांना हैबरगाव येथेच थांबवण्यात आले. यानंतर राहुल यांनीही काँग्रेस नेत्यांसह धरणे आंदोलन केले.

ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी कालीघाट मंदिरात पूजा केल्यानंतर त्यांनी सर्व विश्वास रॅली घेतली. राम मंदिर उद्घाटन कार्यक्रमावरून लक्ष वळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत भाजपने रॅली थांबवण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र त्यांना यात यश मिळू शकले नाही.

अरविंद केजरीवाल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सूचनेवरून आम आदमी पक्षाने आज शोभा यात्रा काढली. सर्व 70 मतदारसंघात आयोजित भंडार्‍या, प्रसाद वाटप आणि शोभा यात्रांमध्ये आपचे सर्व मंत्री, आमदार, नगरसेवक, नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

एमके स्टॅलिन

एमके स्टॅलिन सरकारने अयोध्येत राम मंदिर बांधण्याशी सहमत नसल्याचे म्हटले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना कामाक्षी अम्मान मंदिरातून राम मंदिराचे थेट प्रक्षेपण पहायचे होते. मात्र राज्य सरकारने थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी एलईडी स्क्रीन लावण्यास परवानगी नाकारली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT