Prime Minister Narendra Modi is expected to announce a major Union Cabinet expansion with possible inclusion of new leaders from Maharashtra and NDA allies. AI
देश विदेश

मोदी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल! बड्या मंत्र्यांना डच्चू; ठाकरेसेना फोडणाऱ्या शिंदेंसेनेला बक्षीस, श्रीकांत शिंदेंना मंत्रिपद?

Modi cabinet expansion latest news 2026 : मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. श्रीकांत शिंदे यांना केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची चर्चा आहे.

Namdeo Kumbhar

Shrikant Shinde likely to become Union Minister : राजधानी दिल्लीमध्ये सध्या राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळत विस्तारात (Cabinet Expansion) काही विद्यमान मंत्र्यांचा पत्ता कट होऊ शकतो तर काहींना वेगळं मंत्रालय दिले जाणार असल्याचे समजतेय. त्याशिवाय युवा नेत्यांना संधी देण्याबाबातही मोदी सरकारने निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे गटातील ६ खासदार एनडीएमध्ये (NDA) आणल्यामुळे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केंद्रात मोठे बक्षीस मिळण्याची शक्यताही सूत्रांनी वर्तवली आहे. (Narendra Modi cabinet reshuffle expected ministers list)

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला काय मिळणार?

खासदार श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार श्रीकांत शिंदेंना केंद्रीय शिक्षण कॅबिनेट मंत्रीपद मिळू शकते. संजय बंडू जाधव यांच्याकडे आरोग्य राज्यमंत्रीपदाची (Union Minister of State for Health) जबाबदारी दिली जाऊ शकते. प्रतापराव जाधव यांच्याकडील आरोग्य खाते काढून घेतले जाऊ शकते, त्यांच्याकडे आता केवळ 'आयुष' खातेच राहण्याची शक्यता आहे. त्याशिवाय ओमराजे निंबाळकर यांनाही नव्या मंत्रिमंडळात मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.

'या' बड्या मंत्र्यांचा पत्ता कट होणार? यांना संधी?

सध्याचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि हरदीप सिंग पुरी यांना मंत्रिमंडळातून पूर्णपणे वगळले (डच्चू) जाऊ शकते, असे म्हटले जात आहे. तर निर्मला सीतारामन यांच्याकडून अर्थ खाते काढून घेतले जाण्याची चर्चा आहे. सीतारामन यांच्याकडे आता शिक्षण (HRD) खाते सोपवले जाऊ शकते.

आरबीआयचे (RBI) माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांची थेट कॅबिनेट मंत्री म्हणून अर्थखात्यावर वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. अनुराग ठाकूर यांचे पुन्हा एकदा केंद्रीय कॅबिनेटमध्ये दमदार पुनरागमन होऊ शकते.

सोमवारपर्यंत कॅबिनेट मंत्रि‍पदाचा विस्तार?

उत्तर प्रदेशसह प्रमुख राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि मित्रपक्षांना सोबत ठेवण्यासाठी भाजप ही नवीन राजकीय रणनीती आखत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. येत्या रविवार किंवा सोमवारपर्यंत या नावांवर अंतिम शिक्कामोर्तब होऊ शकते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन या संदर्भात सविस्तर चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT