महात्मा गांधी यांना संपूर्ण जगात ओळखलं जातं ते त्यांनी दिलेल्या अहिंसेच्या, शांततेच्या संदेशामुळे. दरम्यान आज महात्मा गांधी यांची १५४ वी जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्त खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'वैष्णव जन तो' हे महात्मा गांधी यांचं जर्मन गायक कैसेंड्रा मई स्पिटमैनने यांनी गायलेलं गाणं ट्विटरवर शेअर केलं आहे.
आकाशवाणीवरील 'मन की बात' या कार्यक्रमात राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधींचा जन्मदिन आहे. मोहनदास करमचंद गांधी यांना लोक "महात्मा" किंवा "बापू" म्हणून स्मरण करतात आणि त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. अनेक शांततापूर्ण उपक्रमांद्वारे महात्मा गांधींनी अहिंसा किंवा अहिंसेच्या शक्तीचे उदाहरण दिले. त्यांच्या विचारांनी जगातील अनेक नेते प्रभावित झाले आणि होतायेत.
लालबहादूर शास्त्री यांनाही वाहिली श्रद्धांजली
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, भारताचे माजी पंतप्रधान आणि जय जवान जय किसान चे प्रणेते लालबहादूर शास्त्री यांनाही त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मन गायक कैसेंड्रा मई स्पिटमैन यांचा व्हिडीओ ट्विटवर शेअर करताना म्हटलंय की,
गांधीजींचे विचार जगभरातील लोकांच्या मनाला भिडतात!. चेस मे ने गायलेलं "वैष्णव जन तो" चे हे भावपूर्ण गायन ऐका, ज्याचा मी नुकताच मन कि बातमध्ये उल्लेख केला होता. हा व्हिडिओ तिने तिच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.