PM Modi Roadshow Twitter/ANI
देश विदेश

निकालानंतर पंतप्रधान मोदींचा अहमदाबादमध्ये रोड शो; गुजरात निवडणुकीची तयारी सुरु

गुजरातमध्ये वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत.

वृत्तसंस्था

अहमदाबाद - यूपी, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये भाजपला (BJP) दणदणीत विजय मिळाला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींनी अहमदाबादमध्ये रोड शो केला. या ठिकाणी त्यांनी विजयी हात करत जनतसमोर शक्ती प्रदर्शन केलं आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर मोदी त्यांच्या गृहराज्याच्या दौऱ्यावर आले. गुजरातमध्ये (Gujrat) वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत.

त्यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यात पंतप्रधान अहमदाबादमध्ये एका खेल महाकुंभाचे उद्घाटन करतील आणि गांधीनगर जिल्ह्यातील राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला संबोधित करतील. भाजपच्या गुजरात युनिटचे प्रमुख सीआर पाटील यांनी सांगितले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 मार्च रोजी सकाळी अहमदाबाद विमानतळावर पोहोचतील. त्यानंतर ते पक्षाच्या मुख्य कार्यालयापर्यंत रोड शो करतील.

ते म्हणाले की, रोड शो दरम्यान पंतप्रधानांच्या पूर्वनिश्चित ठिकाणी विविध अशासकीय संस्था (एनजीओ), संघटना, भाजप कार्यकर्ते आणि मोदींचे हितचिंतक उपस्थित राहतील. पाटील म्हणाले की, कमलममध्ये मोदी भाजपचे खासदार, आमदार, पदाधिकारी आणि प्रदेश कार्यकारिणीच्या सदस्यांशी संवाद साधणार आहेत. त्यांनी सांगितले की त्याच दिवशी संध्याकाळी मोदी अहमदाबादच्या GMDC मैदानावर महापंचायत संमेलनाला संबोधित करतील.या कार्यक्रमासाठी ४७ लाखांहून अधिक लोकांनी नोंदणी केल्याची माहिती त्यांनी दिली. याअंतर्गत राज्यभरात 500 हून अधिक ठिकाणी विविध खेळांचे आयोजन करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pet Dogs: पाळीव कुत्र्यांना ट्रेनिंग कसे द्यावे? जाणून घ्या

Maharashtra Politics: 'आता तुम्हाला अखेरची संधी' वादग्रस्त मंत्र्यांवर फडणवीसांची नाराजी

Maharashtra Live News Update: आदिवासी आश्रमशाळेत पाण्याची टाकी कोसळून एका 14 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

Horoscope Wednesday : 'या' क्षेत्रात नोकरी करण्याऱ्यांची चांदीच चांदी, काहींच्या कटकटी होतील दूर, वाचा राशीभविष्य

PM Modi: अमेरिकेतून रात्रीच्यावेळी कॉल आला अन्...; PM मोदींनी लोकसभेत सांगितली Operation Sindoor ची कहाणी

SCROLL FOR NEXT