Ram Mandir Postage Stamps Saam Digital
देश विदेश

Ram Mandir Postage Stamps: PM मोदींनी राम मंदिर असलेल्या टपाल तिकीटांच पुस्तकच केलं जारी , २० हून अधिक देशांनी केलाय सन्मान

Ram Mandir Postage Stamps: तप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी अयोध्येतील राम मंदिराचा फोटो असलेलं टपाल तिकीट आणि जगभरातील प्रभू रामावरील टपाल तिकिटांच्या पुस्तकाचं प्रकाशन केलं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Ram Mandir Postage Stamps

तप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी अयोध्येतील राम मंदिराचा फोटो असलेलं टपाल तिकीट आणि जगभरातील प्रभू रामावरील टपाल तिकिटांच्या पुस्तकाचं प्रकाशन केलं. टपाल तिकिटे हा केवळ कागदाचा तुकडा किंवा कलाकृती नसून ती महाकाव्ये आणि महान कल्पनांची लघु आवृत्ती असल्याचे म्हटलं आहे. राम मंदिर, भगवान गणेश, भगवान हनुमान, जटायू, केवलराज आणि शबरी यांच्यावर सहा टपाल तिकिटं आहेत. त्याच्या रचनेत राम मंदिर, चौपई 'मंगल भवन अमंगल हरी' सूर्य, शरयू नदी आणि मंदिराच्या आसपासच्या शिल्पांचा समावेश असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

टपाल तिकीटावर आधारित पुस्तक भगवान रामाच्या आंतरराष्ट्रीय लोकप्रियतेवर प्रकाश टाकते. 48 पानांच्या या पुस्तकात यूएस, न्यूझीलंड, सिंगापूर, कॅनडा, कंबोडिया आणि संयुक्त राष्ट्रांसारख्या संस्थांसह 20 हून अधिक देशांनी जारी केलेली टपाल तिकिटे आहेत.रामायणाचा काळ समाज, जात, धर्म आणि सीमांच्या पलीकडे असून सर्वांना सामावून घेतलं आहे. रामायण प्रेमाच्या विजयाचा संदेश देतं. सर्वात कठीण काळात लोकांना त्याग, एकता आणि शौर्याची शिकवण देतं. त्यामुळेच रामायण महाकाव्य जागतिक आकर्षणाचे केंद्र बनले असून सर्वत्र त्याचा आदर केला जातो, असे गौरोवोद्गार त्यांनी काढले.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

टपाल तिकिटांवरील हे पुस्तक आणि टपाल तिकिटांमधून तरुणांना खूपकाही शिकायला मिळेल, तसेच तरुणांना प्रभू रामाच व्यक्तीमत्व प्रभावित करेल. यावेळी त्यांनी मंदिर स्थापत्य आणि पंचतत्त्वाचं तत्वज्ञान देखील मांडलं. तसेच अनेक देशांनी प्रभू रामावर टपाल तिकिटं जारी केली असून भारतासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. प्रभू रामाचा जगातील अनेक सभ्यतांवर प्रभाव पडला असल्याचंही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News : तीन दिवसानंतर मुंबईत आता पावसाची विश्रांती

Madison Square Garden: न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर 'भारत माता की जय' आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमलं

Nandurbar : बस कंडक्टरकडून विद्यार्थिनींना शिवीगाळ; नंदुरबार बसस्थानकावरील प्रकार, कारवाईची मागणी

Beed : सरकारी वकिलाने कोर्टातच केली आत्महत्या, बीडमध्ये खळबळ

Diabetic patients: पांढरा भात खाल्ल्याने शरीरातील ब्लड शुगरचं काय होतं? मधुमेही रूग्णांनी भात खावा की नाही?

SCROLL FOR NEXT