Tripura Cm Manik Saha On Pm Modi Saam Tv
देश विदेश

Manik Saha On Pm Modi: रामायण आणि महाभारतपेक्षा PM मोदींची 'मन की बात' अधिक लोकप्रिय, त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांचा मोठा दावा

Tripura Cm Manik Saha On Pm Modi: त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी रविवारी असा दावा केला आहे की, 1980 च्या दशकातील महाभारत आणि रामायण या दूरचित्रवाणी मालिकांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मन की बात हा कार्यक्रम लोकांमध्ये अधिक लोकप्रिय आहे.

Satish Kengar

Tripura Cm Manik Saha On Pm Modi:

त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी रविवारी असा दावा केला आहे की, 1980 च्या दशकातील महाभारत आणि रामायण या दूरचित्रवाणी मालिकांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मन की बात हा कार्यक्रम लोकांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. आज मन की बातचा 108 वा भाग प्रसारित झाला. माणिक साहा यांनीही पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसमवेत हा भाग टाऊन बारडोवली येथे ऐकला. यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

ते म्हणाले आहे की, ''आम्ही दर रविवारी दूरदर्शनवरील महाभारत आणि रामायण मालिकांचे पुढील भाग पाहण्यासाठी आमच्या माता-भगिनींमध्ये उत्सुकता पाहिली आहे. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होणारा पंतप्रधानांचा मन की बात हा कार्यक्रम ऐकण्यासाठी आजकाल आपल्या माता-भगिनी उत्सुक असल्याचं दिसतं. हा कार्यक्रम 1980 च्या दशकात दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या मालिकांपेक्षाही अधिक लोकप्रिय आहे.'' ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, 1988 मध्ये दूरदर्शनवर महाभारत आणि 1987 मध्ये रामायण प्रसारित झाले. बीआर चोप्रा यांनी महाभारत तर रामानंद सागर यांनी रामायण मालिकेची निर्मिती केली. या दोन्ही मालिका लोकांमध्ये एवढ्या लोकप्रिय होत्या की, त्यांच्या प्रसारणावेळी रस्ते आणि बाजारपेठा रिकामी व्हायच्या.  (Latest Marathi News)

केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांनीही केले मन की बातचे कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रम देशातील जनतेसाठी प्रेरणादायी असल्याचे केंद्रीय गृह राज्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे (BJP) ज्येष्ठ नेते नित्यानंद राय यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 108व्या मन की बात कार्यक्रमानिमित्त रविवारी त्यांच्या संसदीय मतदारसंघातील समस्तीपूर जिल्ह्यातील उझियारपूर येथील दलसिंगसराय येथील पांडवस्थान येथे आयोजित केलेल्या मन की बात कार्यक्रमानिमित्त लोकांना संबोधित करताना राय म्हणाले की, मन की बातच्या माध्यमातून पंतप्रधान संस्कृतीचा प्रचार करत आहेत. ते गरीबांच्या कल्याणाविषयी बोलतात, जे देशवासियांसाठी फायदेशीर आणि प्रेरणा स्त्रोत आहे.

ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आज एक शक्तिशाली देश बनला आहे आणि विश्वगुरु बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. सर्व घटकांच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. केंद्र पुरस्कृत लाभ योजना थेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT