Mann Ki Baat
Mann Ki Baat Saam TV
देश विदेश

Mann Ki Baat : 'मन की बात'चे १०० एपिसोड पूर्ण! आजही जनतेच्या मनात हा कार्यक्रम खास का आहे?

साम टिव्ही ब्युरो

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधतात. ३० एप्रिल रोजी या कार्यक्रमाचे एकून १०० एपिसोड पूर्ण होत आहेत. UN मुख्यालयातून १०० वा एपिसोड थेट प्रक्षेपीत होत आहे.

या कार्यक्रमात आजवर अनेक रंजक आणि प्रेरणादाई किस्से ऐकायला मिळाले आहेत. महिला सक्षमिकरण, स्वच्छ भारत अभियान अशा सर्वच गोष्टींवर यात चर्चा होते. मन की बात या कार्यक्रमात भौगोलिक, प्रादेशीक, जातीय अशा सर्व सीमांपलिकडे जाऊन माहिती देण्यात आली आहे. (Mann Ki Baat)

मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट जनतेशी संवाद साधता येतो. यात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचे अनुभव सांगता येतात. मन की बात या कार्यक्रमाचा आता जनतेच्या मनावर एक वेगळा ठसा उमटला आहे. न्यू इंडियाच्या कल्पनेतून हा कार्यक्रम चालवला जात आहे.

राजकीय स्वार्थाशिवाय कार्यक्रम

मन की बात या कार्यक्रमात देशातील राजकीय घडामोडींव्यतिरिक्त इतर मुद्द्यांवर चर्चा केली जाते. देशात नागरिकांसमोर असलेल्या विविध समस्यांवर या कार्यक्रमात बातचीत केली जाते. या कार्यक्रमाच्या प्रत्येक भागात सकारात्मक विषयांवरच बोलले जाते.

अनेक कर्तुत्वान व्यक्तींना जगासमोर आणले

मन की बात या कार्यक्रमाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. यात महत्वाचे म्हणजे या कार्यक्रमात देशभरात कोणीही ज्या व्यक्तींना फार ओळत नाही मात्र त्यांचे कार्य खरोखर कौतुकास्पद आहे अशा व्यक्तींना व्यासपीठ उपलब्धल होते. जगासमोर कधीही न आलेल्या व्यक्तींना यात हायलाईट केले जाते.

मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक महिला प्रसिद्धी झोतात आल्या आहेत. सुरेखा यादव या देशातील प्रथम महिला लोकोमोटिव्ह ड्रायव्हर आहेत. त्यांना या कार्यक्रमामुळे जगभर प्रसिद्धी मिळाली. यासह कोविड फ्रंटलाईन मदतनीस पूनम नैटियाल यांना देखील आज संपूर्ण देश मन की बात या कार्यक्रमातून ओळखू लागला आहे. या सर्वांमुळे मन की बात हा कार्यक्रम नागरिकांसाठी नेहमीच खास ठरत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vishal Patil हे भाजपची 'बी' टीम, Chandrahar Patil यांचा गंभीर आरोप

Sharayu Sonawane : साध्या सिंपल पारूचा वेस्टर्न अंदाज पाहिलात का ?

Today's Marathi News Live : लोकल ट्रेनमध्ये नशेखोर तरुणांच्या हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू

Hingoli News : निवडणूक कामात हलगर्जीपणा भोवला; महाविद्यालयाच्या वरिष्ठ प्राचार्यावर गुन्हा दाखल

Raashii Khanna : क्या खूब लगती है, बडी सुंदर दिखती हो...

SCROLL FOR NEXT