PM Modi interview
PM Modi interview ANI
देश विदेश

PM Modi interview: 'सनातन'विरोधात विष पसरवणाऱ्या लोकांसोबत काँग्रेस का बसलीय? PM मोदींचा थेट काँग्रेसला सवाल

Bharat Bhaskar Jadhav

Pm Modi Lok Sabha Election Interview :

सनातनविरोधात विष पसरवणाऱ्या लोकांसोबत काँग्रेस मांडीला मांडी लावून का बसलीय? त्यांच्या मनात काय आहे? काँग्रेसच्या मानसिकतेतील ही विकृती, ही देशासाठी चिंतेची बाब असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलीय. एनएआयला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला सनातन धर्माच्या विरोधप्रकरणी सवाल केलाय.

द्रमुकचे नेते उदयनिधी यांनी सनातन धर्माविषयी अक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर चहुबाजूंनी टीका झाली होती. यासंदर्भात पंतप्रधान मोदींना प्रश्न करण्यात आला होता. त्याला उत्तर देताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका केलीय. काँग्रेसने स्वत:ला प्रश्न केला पाहिजे. ही काँग्रेस तीच आहे का, ज्यांनी महात्मा गांधींना आपल्याशी जोडून घेतलं होतं. ही तीच काँग्रेस आहे का ज्याच्या नेत्या इंदिरा गांधी ज्या आपल्या गळ्यात रुद्राक्षची माळ घालत असायच्या.

सनातनच्याविरोधात विष ओकणाऱ्या लोकांसोबत काँग्रेस का बसलीय, असा प्रश्न काँग्रेसला विचारला गेला पाहिजे. याविषयी त्यांचे राजकारण अपूर्ण राहणार का? काँग्रेसच्या मानसिकतेत ही विकृती आहे का? ही काँग्रेसमध्येच चिंतेची बाब आहे. द्रमुकचा जन्म कदाचित याच द्वेषातून झाला असावा, परंतु प्रश्न द्रमुकबद्दलचा नाही, तर काँग्रेससारख्या पक्षाचा आहे. त्याचे मूळ चारित्र्य हरवले आहे का? ही देशासाठी चिंतेची बाब असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणालेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Potato Prices: सर्वसामान्यांना फटका! भाजीपाल्यासोबत बटाट्याचे दर गगनाला भिडले

Nashik: आता चोरट्यांची नजर कांद्यावर, नाशकात लाखभर रुपयांचा कांदा गेला चोरीस

Today's Marathi News Live : नांदेडमध्ये भंडाऱ्याच्या आंबलीतून 55 जणांना झाली विषबाधा

Jharkhand News : ईडीची मोठी कारवाई, झारखंड सरकारमधील मंत्री आलमगीर आलम यांना अटक

Unemployment Rate : भारतात बेरोजगारी घटली, रोजगारात मोठी वाढ; सर्वेक्षणातून आकडेवारी समोर

SCROLL FOR NEXT