Shreya Maskar
तुम्हाला कमी वेळात झटपट वजन कमी करायचे असले तर आजपासून जेवनात हाय प्रोटीन सॅलडचा वापर करा. यामुळे पोटाची अतिरिक्त चरबी देखील कमी होईल.
हाय प्रोटीन सॅलड बनवण्यासाठी काकडी, उकडलेले चणे, टोमॅटो, कांदा, हरभरे, दही, लिंबाचा रस, कोथिंबीर, पुदिन्याची पाने, काळी मिरी पावडर, मीठ, चाट मसाला इत्यादी साहित्य लागते.
हाय प्रोटीन सॅलड बनवण्यासाठी सर्वप्रथम काकडी स्वच्छ धुवून बारीक तुकडे करून घ्या. सॅलडसाठी कोवळी काकडी घ्या.
त्यानंतर कांदा, टोमॅटो तसेच तुमच्या आवडीच्या भाज्या बारीक चिरून घ्या. यात पुदिना, कोथिंबीर देखील चिरून घ्या.
एका मोठ्या बाऊलमध्ये कापलेली काकडी, कांदा, टोमॅटो आणि इतर भाज्या मिक्स करा. हा पदार्थ फक्त १० मिनिटांत तयार होतो.
त्यानंतर यात शिजवलेले हरभरे, उकडलेले चणे टाकून मिक्स करा. तुम्ही यात उकडलेले कडधान्य देखील टाकू शकता. उदा. मूग, मटकी
यात लिंबाचा रस, पुदिन्याची पाने, कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करा. हिरवेगार सॅलड खाऊन तुमचे पोट आणि मन दोन्ही भरेल.
शेवटी यात चाट मसाला, चवीनुसार मीठ, काळी मिरी पावडर घाला. तुम्ही यात उकडलेला मका आणि हिरवेगार मटार देखील टाकू शकता.