Homemade Pizza Recipe: वीकेंडला घरी करा स्पेशल पिझ्झा पार्टी, अगदी रेस्टॉरंटस्टाइल येईल चव

Shreya Maskar

पिझ्झा पार्टी

तुम्ही वीकेंडला घरीच पिझ्झा पार्टी करा. बाहेर पिझ्झावर पैसे घालवण्यापेक्षा घरीच चवदार पिझ्झा बनवा. लहान मुल आवडीने डिश फस्त करतील.

Pizza | yandex

पिझ्झा

पिझ्झा बनवण्यासाठी मैदा, यीस्ट, साखर, तेल, शिमला मिरची, कोबी, हिरवी मिरची, चीज, पनीर, चिली फ्लेक्स, ओरिगैनो, सॉस, कोथिंबीर, काळी मिरी पावडर, तेल आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.

Pizza | yandex

साखर

पिझ्झा बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये मैदा, यीस्ट, मीठ, तेल, साखर आणि कोमट पाणी घालून कणिक मळून घ्या.ओला कपडा त्यावर टाकून पीठ १५-२० मिनिटे बाजूला ठेवून द्या.

Sugar | yandex

भाज्या

एका बाऊलमध्ये शिमला मिरची, कोबी, मका आणि तुम्हाला आवडतात त्या भाज्या कापून बाऊलमध्ये मिक्स करा. यात थोडे चीज टाका.

Vegetables | yandex

पनीर

दुसरीकडे पॅनमध्ये तूप टाकून त्यात पनीरचे छोटे तुकडे दोन्ही बाजूंनी खरपूस तळून घ्या. गॅस मध्यम आचेवर ठेवा.

Paneer | yandex

मैदा

आता तयार मैद्याच्या पीठाचा एक गोळा घ्या आणि त्याचा गोलाकार बेस लाटून घ्या. त्यावर सर्व सॉस लावा आणि तयार मिश्रण चांगले पसरवून घ्या. याला आवर्जून पिझ्झा सॉस लावा, चव खूपच छान येईल.

flour | yandex

पिझ्झा तळा

आता पॅनमध्ये तूप गरम करून त्यावर पिझ्झा खरपूस भाजून घ्या. शेवटी त्यावर भरभरून चीज घाला. लहान मुलांना चीज खूप आवडते.

Pizza | yandex

चिली फ्लेक्स

शेवटी पिझ्झावर चिली फ्लेक्स, ओरिगैनो टाकून सॉस सोबत त्याचा आस्वाद घ्या. अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळतो तसा पिझ्झा घरी तयार होईल.

Chili flakes | yandex

NEXT : बेकरीसारखा मऊ-लुसलुशीत पाव घरी कसा बनवावा? 'ही' आहे एकदम सोपी रेसिपी

Pav Recipe | yandex
येथे क्लिक करा...