Shreya Maskar
घरीच बेकरी स्टाइल पाव बनवण्यासाठी मैदा, दूध, साखर, ड्राय यीस्ट, बटर किंवा तेल, मीठ, कोमट पाणी इत्यादी साहित्य लागते.
पाव बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये कोमट दूध, साखर आणि ड्राय यीस्ट घालून मिक्स करा. तयार मिश्रण 10 मिनिटे बाजूला झाकून ठेवा. flour
मोठ्या बाऊलमध्ये मैदा, मीठ आणि यीस्टचे मिश्रण टाकून मिक्स करा. त्यात हळूहळू कोमट पाणी किंवा दूध घालून पुन्हा एकजीव करा.
त्यानंतर 15-20 मिनिटे कणिक चांगली मिळून घ्या. जोवर पीठ मऊ होत नाही तोवर ते मळा. जेणेकरून पाव चांगले फुगतील.
ब्रेकिंग ट्रेला तूप लावून सर्व मिश्रण त्यात भरा आणि 45-50 मिनिटांसाठी ओव्हनमध्ये बेक करा. ट्रेला तूप भरभरून लावा. जेणेकरून पाव नीट बाहेर येतील.
पाव चांगला फुलला आहे की नाही? हे दाबून पाहा. तसेच त्याला सुंदर गोल्डन रंग येई पर्यंत बेक करा. जेणेकरून त्याचा स्वाद अजून वाढेल.
पाव बेक झाल्यानंतर लगेच वरून वितळलेले बटर लावा आणि पाव 10 मिनिटे थंड होऊ द्या. त्यानंतर गरमागरम पाव भाजी, चहासोबत खा.
पाव बनवताना पदार्थांचे योग्य प्रमाण असते महत्त्वाचे आहे. जेणेकरून तो चांगला बनेल. जळणार किंवा कच्चा राहणार आहे.