Pm Modi Egypt Visit Saam Tv
देश विदेश

Pm Modi Egypt Visit: अमेरिकेनंतर इजिप्तमध्येही PM मोदींचं जंगी स्वागत, देण्यात आला गार्ड ऑफ ऑनर

अमेरिकेनंतर इजिप्तमध्येही PM मोदींचं जंगी स्वागत, देण्यात आला गार्ड ऑफ ऑनर

Satish Kengar

Pm Modi Egypt Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी इजिप्तच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर शनिवारी संध्याकाळी कैरो येथे पोहोचले आहे. पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच इजिप्त दौरा आहे. कैरो विमानतळावर इजिप्तच्या पंतप्रधानांनी मोदींचे स्वागत केले. त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

तब्बल 26 वर्षांनंतर भारतीय पंतप्रधान द्विपक्षीय भेटीसाठी इजिप्तला पोहोचले आहेत. पंतप्रधान मोदी आज कैरोमध्ये इजिप्तचे पंतप्रधान मुस्तफा मैडबौली यांच्यासोबत गोलमेज बैठक घेणार आहेत. यानंतर ते भारतीय समुदायातील लोकांशी संवाद साधतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता अल हकीम मशिदीला भेट देतील. यानंतर ते हेलिओपोलिस वॉर सेमेटरीला भेट देतील.

त्यानंतर ते इजिप्शियन प्रेसिडेंसीमध्ये आयोजित कार्यक्रमात सहभागी होतील. यानंतर पंतप्रधान मोदी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष एल सिसी यांची भेट घेणार आहेत. (Latest Marathi News)

रविवारी पंतप्रधान मोदी एका बैठकीला उपस्थित राहतील. ज्यामध्ये शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा होईल. या बैठकीत काही करारांवर स्वाक्षऱ्या होणार असून याबाबतचे प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात येणार आहे. पीएम मोदींची दुपारी २ वाजता पत्रकार परिषद होणार असून दुपारी ३ वाजता ते भारतासाठी रवाना होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : राहुल गांधी सुप्रीम कोर्टातून बाहेर पडले

Maharashtra News Live Update: सोमेश्वरच्या निकालात सुनेत्रा पवारांचे वर्चस्व; सातही निकाल त्यांच्या बाजूने

Late night sleeping: रात्री झोपण्याची योग्य वेळ कोणती? रात्री जागणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे

देशातील हा दुसरा स्वातंत्र्य लढा; महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी असं का म्हणाले?

Nagpur Fort : नागपूरजवळ लपलाय ३०० वर्षांचा ऐतिहासिक वारसा, कैद्यांसाठी तुरुंग बनलेला विदर्भातील 'हा' किल्ला पाहिलात का?

SCROLL FOR NEXT