PM Modi, Cabinet Reshuffle : केंद्रातील मोदी सरकारमध्ये लवकरच मंत्रिमंडळ फेरबदलाची (Cabinet reshuffle) शक्यता वर्तवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक 'सेवा तीर्थ' डझनाहून अधिक राज्यमंत्री आणि स्वतंत्र प्रभार असलेल्या मंत्र्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. ३ तासांहून अधिक काळ चाललेल्या या बैठकीत वेगवेगळ्या विषयावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीला कोणत्याही ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्याला किंवा उच्चपदस्थ सनदी अधिकाऱ्याला (IAS) सहभागी करून घेण्यात आले नव्हते.
या बैठकीत कृषी, शिक्षण, ग्रामीण विकास आणि सामाजिक न्याय अशा महत्त्वाच्या विभागांच्या राज्यमंत्र्यांनी आपल्या कामाचा, योजनांचा आणि आतापर्यंतच्या कामगिरीचा लेखाजोखा थेट पंतप्रधान मोदींसमोर मांडला. पंतप्रधानांनी सर्व मंत्र्यांना केंद्राच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पारदर्शकपणे पोहोचवण्याचे आणि प्रलंबित प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
पंतप्रधान मोदी राज्यमंत्र्यांना काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यमंत्र्यांशी थेट संवाद साधण्याची ही पहिलीच वेळ आहे. आगामी काळात अशा आणखी बैठका होणार आहेत. या बैठकांद्वारे पंतप्रधान मोदी प्रत्येक मंत्र्यांच्या कामाचे मूल्यांकन करत असून, याच कामगिरीच्या आधारे आगामी काळात केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल केले जाण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला जबाबदारी मिळणार तर कुणाचा पत्ता कट होणार? याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
पंतप्रधान मोदी आज गुजरात-महाराष्ट्र दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात आणि महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान ३५,००० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे राष्ट्राला लोकार्पण करतील आणि ग्लोबल फिनटेक फेस्टचे उद्घाटन करतील. एका अधिकृत निवेदनानुसार, पंतप्रधान मोदी सर्वप्रथम वडोदरा येथे जातील, जिथे ते विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी करतील, त्यांचे उद्घाटन करतील आणि ते राष्ट्राला समर्पित करतील. या प्रसंगी ते एका सभेला संबोधितही करतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.