Jharkhand Political Crisis Saam Saam Digital
देश विदेश

Jharkhand Political Crisis: सरकार पण नाही हैदराबाद पण नाही...., झारखंडमध्ये न भूतो न भविष्य राजकीय संघर्ष

Jharkhand High Voltage Political Drama: सध्या भारतीय इतिहासात कधीही पहायला न मिळालेला राजकीय ड्रामा झारखंडमध्ये ड्रामा सुरूच आहे. राज्यपालांनी नवीन सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिलं नाही.

Sandeep Gawade

Jharkhand High Voltage Political Drama News

सध्या भारतीय इतिहासात कधीही पहायला न मिळालेला राजकीय ड्रामा झारखंडमध्ये ड्रामा सुरूच आहे. राज्यपालांनी नवीन सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिलं नाही. त्यामुळे आमदारांना झारखंडमधून हैद्राबादला हलवण्यासाठी दोन चार्टर विमानं तयार ठेवण्यात आली होती. सुमारे दोन तास आमदार विमानात बसून राहिले. मात्र विमानांच उड्डान काही झालं नाही. दाट धुकं आणि खराब हवामानाचं कारण देत विमानांचं उड्डाण रद्द करण्यात आलं आहे. पण सरकार कसं स्थापन होणार? मुख्यमंत्री कोण होणार? हे प्रश्न अजूनही राजकीय संघर्षाच्या दाट धुक्यात दडले आहेत.

झारखंडमधील सध्याची परिस्थिती पाहता शुक्रवारचा दिवस का आहे महत्त्वाचा?

1- हेमंत सोरेन यांच्यासाठी ED किती दिवसांचा रिमांड घेणार? यावर लक्ष केंद्रित केले जाईल.

२- राज्यपाल शपथविधीची तारीख ठरवणार की नाही? हे महत्त्वाचं असेल.

3- हेमंत सोरेन यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.

4- आमदार उद्या हैदराबादला जाणार की नाही? यावरही सस्पेन्स कायम आहे.

बिहारमध्ये होऊ शकत झारखंडमध्ये का नाही?

नितीश कुमार यांनी रविवारी सकाळी बिहारमध्ये राजीनामा दिला. रविवारी दुपारी काही तासांतच भाजपने नितीश यांच्या नेतृत्वाखाली एनडीएला पाठिंब्याचं पत्र दिलं. रविवारी संध्याकाळीच राज्यपाल बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या सरकारची शपथ घेतात. पण झारखंडमध्ये तशी परिस्थिती नाही. झारखंडमध्ये मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी बुधवारी रात्री राज्यपालांकडे राजीनामा सोपवला. बुधवारी रात्रीच चंपाई सोरेन यांनी राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा केला.

राजकीय अस्थिरता

राज्यपालांनी झामुमोच्या आमदारांना गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजता भेटण्याची वेळ दिली. JMM आघाडीचे नेते चंपाई सोरेन आले. काही वेळातच बैठक संपली. बाहेर येताच चंपाई सोरेन म्हणाले की, राज्यपाल संधी देत ​​नाहीत, वेळ देत नाहीत. याशिवाय झामुमोचे खासदार महुआ मांझी म्हणाले की, 22 तासांपेक्षा जास्त वेळ झाला आहे. बिहारमध्ये तुम्ही पाहिलं की शपथविधी अवघ्या २४ तासांत झाला.त्यांच्या हेतूवर संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, काँग्रेस नेते शशी भूषण म्हणाले की, पाटण्यात 4 तासात शपथविधी होतो. आपल्याकडे बहुमत असूनही आमची गळचेपी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : वाहने जपून चालवावी, मनोबल कमी होणार; ५ राशींच्या लोकांचा ताण वाढणार, वाचा सोमवारचं राशीभविष्य

Monday Horoscope : शेवटच्या श्रावण सोमवारी महादेवाची कृपा होणार; ३ राशींचं नशीब फळफळणार

Shirpur Snake Birthday Celebration : बर्थडे आहे कोब्रा नागाचा! सर्पमित्राचा सोशल मीडियावर रिल्ससाठी थिल्लरपणा, व्हिडिओ व्हायरल होताच...VIDEO

Gajkesari Rajyog: आज गुरु चंद्राच्या युतीने तयार होणार गजकेसरी राजयोग; 'या' राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा

Todays Horoscope: 'या' राशींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

SCROLL FOR NEXT