Brazil Plane Crash Video Saam TV
देश विदेश

Plane Crash Video : उड्डाण भरताच विमान गरागरा फिरलं अन् कोसळलं; 62 प्रवाशांच्या मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद

Satish Daud

ब्राझीलच्या विन्हेडो प्रांतात मोठी शुक्रवारी एक मोठी दुर्घटना घडली. 62 प्रवाशांना घेऊन निघालेलं विमान अचानक हवेत नादुरुस्त झालं. त्यानंतर हवेतच घिरट्या मारत हे विमान जमिनीवर कोसळलं. या दुर्घटनेत विमानातील सर्व 62 प्रवाशांचा मृत्यू झाला. अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या विमान दुर्घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

ब्राझीलच्या (Brazil) स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विमान हे व्होपास लिन्हास एरिआज कंपनीचं होतं. प्रवाशांना घेऊन हे विमान पराना राज्यातील कास्केवेल शहरातून साओ पाऊलोमधील ग्वारुलहोसला जात होतं.

या विमानातून 58 प्रवासी आणि 4 विमान कर्मचारी प्रवासी प्रवास करीत होते. दरम्यान, उड्डाण भरल्यानंतर अचानक विमानातील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्यानंतर वैमानिकाचा विमानतळाशी असलेला संपर्क तुटला.

काही क्षणातच विमानाने हवेत घिरट्या (Plane Crash) मारण्यास सुरुवात केली. वैमानिकाने विमानावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना अपयश आलं. अखेर 62 प्रवाशांसह उंच आकाशातून विमान थेट जमिनीवर कोसळलं.

विमान कोसळल्यानंतर एका मोठ्या स्फोटाचा आवाज झाला. या आवाजाने आजूबाजूचा परिसर हादरला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी विमान कोसळलं तिथून आगीचे मोठे लोळ दिसत होते. या विमान अपघाताचा थरार काहींनी आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात कैद केला.

दरम्यान, विमान कोसळल्याचं कळताच संपूर्ण ब्राझील शहरात एकच खळबळ उडाली. विमान ज्या भागात कोसळलं तिथे अग्निशमन दलाची पथकं आणि बचाव पथकं तातडीने रवाना झाली. अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.

मात्र, तोपर्यंत विमानातील 62 जणांचा कोळसा झाला होता. रात्री उशिरापर्यंत मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु होते. विमान नेमकं कशामुळे कोसळलं, विमानात आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेलं नाही. या घटनेनं संपूर्ण विन्हेडो प्रांतावर शोककळा पसरली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT