Central Government On Pertol- Diesel Price Saam Tv
देश विदेश

Petrol-Diesel Price: निवडणुका संपताच पेट्रोल-डिझेल ३० रुपयांनी महागणार? केंद्र सरकारने दिली महत्वाची अपडेट

Central Government On Pertol- Diesel Price: पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत केंद्र सरकारने महत्वाची अपडेट दिली आहे. विधानसभा निवडणूक संपल्यानंतर पेट्रोल-डिझेलचे दर २५ ते ३० रुपायांनी वाढणार हे वृत्त सरकारने फेटाळून लावले.

Priya More

Summary -

  • पेट्रोल-डिझेल दर वाढीच्या अफवा खोट्या ठरल्या

  • पेट्रोल-डिझेल दर वाढीचे वृत्त केंद्र सरकारने फेटाळून लावले

  • निवडणुकांनंतर दर वाढणार नाहीत असा दावा

  • नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये सरकारकडून आवाहन

इराण- अमेरिका युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात देखील चढउतार पाहायला मिळत आहेत. अशामध्ये असा दावा केला जात आहे की, पश्चिम बंगालसह ५ राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुका संपल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार आहेत. २५ ते ३० रुपयांपर्यंत पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण आता केंद्र सरकारने या बातम्यांचे खंडन केले आहे. अशा दिशाभूल करणाऱ्या बातम्यांच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने एक नोटीस जारी केली आहे.

५ राज्यातील विधानसभा निवडणुका संपल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर २५ ते ३० रुपयांनी वाढ होईल, असे दावे करणारे वृत्त पेट्रोलियम मंत्रालयाने फेटाळून लावले आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने सोशल मीडयावर यासंदर्भात पोस्ट केली आहे.

या पोस्टमध्ये मंत्रालयाने स्पष्टपणे सांगितले की, सरकार अशा कोणत्याही प्रस्तावावर विचार करत नाही. पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ होऊ शकते अशा बातम्या जनतेमध्ये भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने पसरवल्या जात आहेत. हे वृत्त खोडसाळ आणि दिशाभूल करणारे आहे.

मंत्रालयाकडून असे सांगण्यात आले आहे की, 'या जागतिक अस्थिरतेच्या काळातही भारत अशा काही मोजक्या देशांपैकी एक आहे जिथे जनतेवर कोणताही बोजा पडलेला नाही. तसंच भारत हा एकमेव असा देश आहे जिथे गेल्या चार वर्षांत पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढलेल्या नाहीत. आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेल्या किमतींपासून सामान्य जनतेचे संरक्षण करण्यासाठी सरकार आणि सरकारी तेल कंपन्यांनी सातत्याने उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाडकींना सरकारी लाभ सोडवेना; अपात्र लाडकींनी वळवला 'या' योजनांकडे मोर्चा

Kalyan : बौद्धभूमी फाउंडेशन प्रकरणात मोठी अपडेट; श्रीकांत शिंदेंनी KDMC आणि MMRDA ला दिले सखोल चौकशीचे आदेश

कर्जमाफीच्या अटी, शेतकऱ्यांसाठी कटकटी; केवळ 17 लाख शेतकऱ्यांनाच संपूर्ण कर्जमाफी?

'मोदींचे सरकार जाणार, आणीबाणी येणार'; राहुल गांधींचा खळबळजनक दावा

Fact Check: शाहरूख खान कॉकरोच जनता पार्टीत जाणार? लवकरच पार्टी जॉईन करण्याची घोषणा?

SCROLL FOR NEXT