Petrol Diesel Latest Price Saam tv
देश विदेश

कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ; पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, जाणून घ्या आजचा भाव

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचा भाव प्रतिबॅरेल 123 डॉलरपर्यंत पोहचला.

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे (Crud Oil) भाव पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. बुधवारी सकाळी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचा भाव प्रतिबॅरेल 123 डॉलरपर्यंत पोहचला. त्यानंतर भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलच्या दरात (Petrol-Diesel) कोणताही बदल करण्यात आला नसून, भाव स्थिर आहेत. (Petrol Diesel Price Today in Mumbai Maharastra)

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळे कंपन्यांवर किरकोळ किमतीत वाढ करण्याचा दबाव दिसून येत आहे. मात्र दुसरीकडे पेट्रोल, डिझेलचे दर वाढत नसल्याने याचा मोठा फटका हा पेट्रोलियम कंपन्यांना बसताना दिसून येत आहे. सध्या भारताला रशिया, युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाकडून कच्च्या तेलाच्या दरात तीस टक्के सूट देण्यात आली आहे.

याच सवलतीचा फायदा घेत रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आयात करण्यात येत आहे. त्यामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असल्याचे बोलले जात आहे. विशेष बाब म्हणजे केंद्र सरकारने मे महिन्यात पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. यानंतर पेट्रोलच्या दरात कमाल 9 रुपयांनी तर डिझेलच्या दरात 7 रुपयांनी स्वस्त झाले होते.

दरम्यान, सोमवारी सकाळी जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 96.72 रुपये इतका आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 109.27 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 97.28 रुपये एवढा आहे.

4 प्रमुख महानगरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर

मुंबई - मुंबईत पेट्रोल 109.27 रुपये आणि डिझेल प्रतिलिटर 95.84 रुपयांनी विकलं जातंय.

दिल्ली - दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 96.72 आणि डिझेलचा दर 89.62 इतका आहे.

चेन्नई - चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये प्रतिलिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रतिलिटर इतक्या दराने विकलं जातंय.

कोलकाता - कोलकत्यामध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.03 रुपये आणि डिझेल दर प्रतिलिटर 92.76 रुपये इतका आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही

Horoscope: दसऱ्याला बुध-गुरूची युती होणार, ३ राशींवर परिणाम, खिशात राहणार पैसाच पैसा

Pune : पुण्यातील धक्कादायक घटना, तरुणीला रस्त्यावर लाथांनी बेदम मारहाण | VIDEO

Zubeen Garg Death Case : गायक झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई; मॅनेजर अन् महोत्सव आयोजकाला अटक

Facebook New Feature: सोशल मीडिया क्रिएटर्ससाठी खुशखबर! फेसबुकच्या नव्या फीचरने वाढेल कमाई

SCROLL FOR NEXT