Petrol Price Today, Diesel Price Today, Fuel Rate Today  Saam Tv
देश विदेश

Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चढ-उतर पाहायला मिळत आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चढ-उतर पाहायला मिळत आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार झाल्यामुळे तेल कंपनीने त्यानुसार सोमवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहे. आज पेट्रोलचा दर १०० रुपयाहूंन अधिक झाला आहे. तर डिझेलचा दर ९० रुपयांहून अधिक झाला आहे. (Latest Marathi News)

आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या आठवड्यात कच्च्या तेलाच्या दरात भावात घसरण पाहायला मिळाली. ब्रेंट क्रूड ऑईलची किंमत ८३ डॉलर प्रति बॅरेल होती. आज कच्च्या तेलाच्या दरात उसळी पाहायला मिळाली. आज ऑईलची किंमत ८५ डॉलर प्रति बॅरेल पार पोहोचली आहे. डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल हे ७९.२५ प्रति डॉलर प्रति बॅरेल आहे.

दिल्ली-मुंबईत पेट्रोलचा भाव काय?

दिल्लीत पेट्रोलचा (Petrol) भाव ९६.७२ रुपये आहे. तर डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत (Mumbai) पेट्रोल भाव १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४. २४ रुपये प्रति लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये आहे. तर डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर आहे.

पेट्रोल-डिझेलच्या दराची माहिती कशी होते?

पेट्रोल-डिझेलचे दर रोज जाहीर होतात. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या सरकारी तेल कंपन्या त्यांचे दर जाहीर करतात. या सर्व सरकारी कंपन्या सकाळी ६ वाजता पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करतात. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारकडून कर , शिपिंग खर्च आणि डिलर कमिशन समाविष्ट असते.

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल.

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Card on WhatsApp: आता व्हॉट्सअ‍ॅपवरही मिळणार आधार कार्ड, झटपट डाउनलोड करण्याच्या सोप्या स्टेप्स

Khandeshi Vangyache Bharit Recipe: खान्देशी स्टाईल झणझणीत वांग्याचं भरीत कसं बनवायचं?

Maharashtra Live News Update : निकाल लागल्यानंतर शिंदेंच्या कार्यकर्त्यांची कार पेटवली, घटना सीसीटीव्हीत कैद

Mrunal And Dhanush: मृणाल ठाकूर आणि धनुष व्हॅलेंटाईन डेला अडकणार लग्नबंधनात? वाचा महत्वाची अपडेट

Palmistry: अशा व्यक्ती राजकारण-मॉडेलिंगमध्ये कमावतात खूप नाव; पाहा तुमच्या हातावरच्या रेषा काय सांगतात?

SCROLL FOR NEXT