Manasvi Choudhary
अस्सल खान्देशी वांग्याचं भरीत हे फार चवीष्ट लागते. हे भरीत इतर ठिकाणच्या भरीतापेक्षा वेगळे असते कारण यात मसाले वेगळे असतात.
खान्देशी स्टाईल वांग्याचं भरीत बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे तु्म्ही घरीच ही रेसिपी बनवू शकता.
वांग्याच भरीत बनवण्यासाठी वांगी, कांद्याची पात, हिरव्या मिरच्या , आलं- लसूण , शेंगदाणे, तेल, जिरे, मोहरी, कोथिंबीर हे साहित्य एकत्र करा.
वांग्याचं भरीत बनवण्यासाठी वांग्यांना थोडे तेल लावून गॅसवर किंवा कोळशावर सर्व बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्या वांगी भाजल्यावर ती थोडा वेळ थंड होऊ द्या, मग त्याची सालं काढून घ्या.
एका बाऊलमध्ये भाजलेल्या वांग्याचा गर घेऊन तो हाताने किंवा स्मॅशरने व्यवस्थित मॅश करा.
गॅसवर कढईत गरम तेलामध्ये मोहरी, जिरे आणि कढीपत्ता याची फोडणी द्या नंतर यात शेंगदाणे टाकून ते कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
आता त्यात ठेचलेला लसूण, आले आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घाला. लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत परता. त्यानंतर त्यात हळद घाला.
आता या मिश्रणात बारीक चिरलेली कांद्याची पात घाला. पात जास्त शिजवायची नाही, फक्त १-२ मिनिटे परतायची आहे जेणेकरून तिचा कुरकुरीतपणा टिकून राहील.
मॅश केलेला वांग्याचा गर आणि चवीनुसार मीठ घालून सर्व व्यवस्थित एकत्र करा. नंतर मिश्रणावर झाकण ठेवून भरीत शिजवून घ्या.