Petrol Diesel Latest Price Saam TV
देश विदेश

Petrol Diesel Price: महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी घसरण; वाचा तुमच्या शहरातील नवे दर

Petrol Diesel Price Today 20 May 2023: महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

Shivani Tichkule

Petrol Diesel Latest Rates: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत आज थोडीशी घसरण पाहायला मिळत आहे. WTI क्रूड 0.43 टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल 71.55 डॉलरवर व्यापार करत आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड 0.37 टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल 75.58 डॉलरवर विकले जात आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर सुधारित केले जातात.  (Latest Marathi News)

महाराष्ट्रात (Maharashtra) पेट्रोलचा दर 1 रुपयांनी कमी होऊन 105.96 रुपयांवर पोहोचला आहे. त्याच वेळी, डिझेलच्या (Diesel) दरात 0.97 पैशांची घसरण झाली असून ते 92.49 रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे. पंजाबमध्ये पेट्रोल 0.47 पैशांनी तर डिझेल 0.45 पैशांनी स्वस्त झाले आहे.

त्याचप्रमाणे हरियाणा, केरळ, सिक्कीम आणि झारखंडमध्ये पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. दुसरीकडे, तेलंगणामध्ये पेट्रोल 1.48 रुपयांनी आणि डिझेल 1.39 रुपयांनी महागले असून ते अनुक्रमे 111.83 रुपये आणि 99.84 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक, ओडिशासह अन्य काही राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेल महाग झाले आहे.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.73 रुपये आणि डिझेल 94.33 रुपये प्रति लिटर

– कोलकाता में पेट्रोल 106.03 रुपये और डीजल 92.76 रुपये प्रति लीटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. (Petrol Diesel Price)

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भाजप शिवसेना स्वबळावर लढणार

Thalapathy Vijay: जन नायकन! थलापथी विजयचा ३३ वर्षांच्या फिल्मी करिअरला रामराम, पूर्णवेळ राजकारणात होणार सक्रिय

Accident : उत्तरखंडमध्ये भयंकर अपघात, बस दरीत कोसळली, ७ जणांचा मृत्यू

PM Khaleda Zia : बांग्लादेशवर शोककळा! पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा झिया यांचे निधन

Election: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा नवी मुंबईत एकला चलोचा नारा, शिवसेना- भाजप आमने-सामने; संभाजीनगरमध्येही युती तुटली

SCROLL FOR NEXT