Petrol Diesel Latest Price, Fuel Price updates Saam TV
देश विदेश

Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त होणार? जाणून घ्या आजचे दर

तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केलेत.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - गेल्या अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती सातत्याने १०० डॉलरच्या आसपास आहेत. तर मान्सून सुरू होताच पेट्रोल (Petrol) आणि डिझेलची (Diesel) मागणी घटली आहे. जागतिक मानक ब्रेंट क्रूड फ्युचर्स प्रति बॅरल 99.76 डॉलरवर पोहोचले आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सर्वसामान्यांना दिलासा देत केंद्र सरकारने मे महिन्यात पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 8 रुपयांनी आणि डिझेलवरील 6 रुपयांनी कमी केले होते. तेव्हापासून देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

महाराष्ट्रात व्हॅट कपातीची घोषणा

नुकतीच महाराष्ट्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटमध्ये कपात केली होती, त्यानंतर राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले आहेत. राज्य सरकारने पेट्रोलवरील व्हॅटमध्ये 5 रुपयांनी आणि डिझेलवर 3 रुपयांनी कपात केली.

हे देखील पाहा -

महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर

दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये तर डिझेलचा दर 89.62 रुपये प्रति लिटर आहे.

मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लीटर आहे.

कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

इतर शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर

लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

नोएडामध्ये पेट्रोलची किंमत 96.57 रुपये आणि डिझेलची किंमत 89.96 रुपये प्रति लिटर आहे.

गुरुग्राममध्ये पेट्रोलचा दर 97.18 रुपये आणि डिझेलचा दर 90.05 रुपये प्रति लिटर आहे.

जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

तिरुअनंतपुरममध्ये पेट्रोलचा दर 107.71 रुपये आणि डिझेलचा दर 96.52 रुपये प्रति लिटर आहे.

पाटणामध्ये पेट्रोलचा दर 107.24 रुपये आणि डिझेलचा दर 94.04 रुपये प्रति लिटर आहे.

पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

बंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

भुवनेश्वरमध्ये पेट्रोलचा दर 103.19 रुपये आणि डिझेलचा दर 94.76 रुपये प्रति लिटर आहे.

हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

चंदीगडमध्ये पेट्रोलचा दर 96.20 रुपये आणि डिझेलचा दर 84.26 रुपये प्रति लिटर आहे.

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारे तपासा

दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलचे दर हे दररोज बदलतात. हे बदललेले दर रोज सकाळी सहा वाजता जाहीर केले जातात.तुम्हाला जर हे रोजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर पाहायचे असतील तर खालीलप्रमाणे जाणून घेऊ शकता.

-SMS द्वारे पेट्रोल-डिझेलचे रोजचे नवीन दर देखील जाणून घेऊ शकता. यासीठ इंडियन ऑइलचे ग्राहक RSP 9224992249 या नंबरवर आणि BPSL ग्राहक 9223112222 या क्रमांकावर RSP पाठवून दराबाबतची माहिती मिळवू शकतात. तर, एचपीसीएल ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPP price किंमत जाणून घेऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: राज ठाकरेंना धमकी देणं पडलं महागात, उद्योजक सुशील केडियांचं ऑफिस मनसैकिांनी फोडलं, पाहा VIDEO

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्याला तोबा गर्दी, वरळी डोमबाहेर कार्यकर्त्यांच्या रांगा

Metro In Dino : 'मेट्रो इन दिनों'ची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले फक्त 'इतके' कोटी

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Worli Dome : वरळी डोममध्ये पाहणीदरम्यान संजय राऊत आणि प्रकाश महाजन यांची गळाभेट | VIDEO

SCROLL FOR NEXT