Petrol Diesel Latest Price, Fuel Price updates Saam TV
देश विदेश

Petrol Diesel : महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल स्वस्त तर हिमाचलमध्ये महाग; जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत थोडीशी घसरण झाली आहे. शनिवारी ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 95.77 डॉलर आणि WTI प्रति बॅरल 87.90 डॉलरवर विकले जात आहे. देशातील सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) नवे दर जाहीर केले आहेत. अनेक राज्यांमध्ये इंधनाच्या किमतीत थोडा बदल झाला आहे. (Petrol Diesel Latest Price In Marathi)

हिमाचल प्रदेशमध्ये पेट्रोलचा दर 0.68 रुपयांनी वाढून 95.74 रुपये आणि डिझेलचे दर 0.58 रुपयांनी वाढून 81.99 रुपये प्रति लिटर झाले आहे. गुजरातमध्ये पेट्रोल 0.22 रुपयांनी वाढून 96.44 रुपये आणि डिझेल 0.23 रुपयांनी वाढून 92.19 रुपये झाले आहे. दुसरीकडे बिहारमध्ये पेट्रोलच्या दरात किंचित वाढ झाली आहे. 

याशिवाय महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले आहे. झारखंडमध्ये पेट्रोल 100.13 रुपये आणि डिझेल 0.62 रुपयांनी घसरून 94.93 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. देशातील 4 महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात. 

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guru Vakri 2024: ऑक्टोबर महिन्यात गुरु चालणार वक्री चाल; 'या' राशींच्या आयुष्यात येणार अडचणी

Maratha Reservation: आरक्षणासाठी एल्गार! मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ आज बीड, धाराशिव जिल्हा बंद; रविवारी पुणे, परभणी 'जिल्हा बंद'ची हाक

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल ९२००० रुपये मिळणार पगार; जाणून घ्या अर्जप्रक्रिया

Bigg Boss Marathi : अरबाज-निक्कीच्या जोडीने पुन्हा मारली बाजी; प्रतिस्पर्धी सलग दुसऱ्यांदा बॅकफुटवर; नेमकं काय घडलं?

Nashik News : नाशिकमध्ये ५ पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी; आजपासून १५ दिवस मनाई आदेश, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT