Petrol-Diesel Price Saam TV
देश विदेश

Petrol Diesel: कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण; 'या' ठिकाणी 84.10 रुपये पेट्रोल

जाणून घ्या आजचे पेट्रोल- डिझेलचे नवे दर

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - देशात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरात चढ-उतार होत असतात. मात्र, पेट्रोल आणि डिझेलचे दर गेल्या काही दिवसापासून स्थिर असून त्यात कोणताही बदल झालेला नाही. महिनाभरापूर्वी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी घसरण झाली.

कच्च्या तेलाचे प्रतिबॅरेल 10 डॉलर्सनी घसरले आहेत. त्यामुळे कच्च्या तेलाच्या देर 100 डॉलरच्या खाली आले आहेत. WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल 102.5 डॉलर वर पोहोचली आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 104.4 डॉलर वर पोहोचले.

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर होतात. त्यानंतर सकाळी ६ वाजल्यापासून नवे दर लागू करण्यात येतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यामुळे त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते.

हे देखील पाहा -

आजचे भाव काय आहेत?

- पोर्टब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लीटर

- दिल्लीमध्ये पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

- मुंबईमध्ये पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल रुपये 97.28 रुपये

- चेन्नईमध्ये पेट्रोल 96.26 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 प्रति लिटर

- कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लीटर

- नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर

- लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर

- जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये लिटर लिटर

– तिरुवनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर

– पाटण्यात पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर

- गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर

- बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर

- भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर

- चंदीगडमध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर

- हैदराबादमध्ये 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारे तपासा

दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलचे दर हे दररोज बदलतात. हे बदललेले दर रोज सकाळी सहा वाजता जाहीर केले जातात.तुम्हाला जर हे रोजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर पाहायचे असतील तर खालीलप्रमाणे जाणून घेऊ शकता.

-SMS द्वारे पेट्रोल-डिझेलचे रोजचे नवीन दर देखील जाणून घेऊ शकता. यासीठ इंडियन ऑइलचे ग्राहक RSP 9224992249 या नंबरवर आणि BPSL ग्राहक 9223112222 या क्रमांकावर RSP पाठवून दराबाबतची माहिती मिळवू शकतात. तर, एचपीसीएल ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPP price किंमत जाणून घेऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT