Petrol Diesel Latest Price Saam TV
देश विदेश

Petrol Diesel Prices : राजस्थानसह ४ राज्यात पेट्रोल महागलं; महाराष्ट्रात आजचा भाव काय? जाणून घ्या...

कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण होताच, भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे दर जारी केलेत.

साम टिव्ही ब्युरो

Petrol Diesel Prices : इंधनाचे दर हे कच्चा तेलाच्या (Crud Oil) किंमतीवर आधारभूत असतात. गेल्या काही दिवसांपासून जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण होत आहे. शुक्रवारी सकाळी सुद्धा कच्चा तेलाच्या किमतीत घट झाल्याचं पाहायला मिळालं. जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडचे दर प्रतिबॅरेल 88.51 पर्यंत घसरले. कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण होताच, भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे दर जारी केलेत. (Petrol Diesel Latest Price Today)

भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी जारी केलेल्या दरानुसार, आजही देशातील मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता या चार महानगरांमध्ये इंधनाच्या (Petrol-Diesel) दरात कोणताही बदल झालेला नाही. राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 96.72 रुपये इतका आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.31 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 94.27 रुपये एवढा आहे. (Latest Marathi News)

राज्यांबद्दल बोलायचे तर, बहुतेक राज्यांमध्ये किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. आज राजस्थानसह 4 राज्यांमध्ये केवळ 34 पैशांची वाढ झाली आहे. राजस्थानमध्ये पेट्रोल 108.85 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 94.06 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. याशिवाय तेलंगणात पेट्रोल आता 34 पैशांनी घसरून 111.32 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 33 पैशांनी घसरून 99.36 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. (Maharashtra News)

देशातील 4 प्रमुख महानगरातील पेट्रोल डिझेलचे भाव

– दिल्लीमध्ये पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईमध्ये पेट्रोल 106.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकातामध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

दररोज सकाळी 6 वाजता जाहीर होतात नवीन दर

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha vijay live updates : विजयी मेळावा, राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकाच मंचावर, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना कर्ज नाही; अजित पवारांचं आश्वासन हवेत विरलं, कारण काय?

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

Saturday Horoscope : मोठी स्वप्न पूर्ण होतील, दिवस चांगला जाणार; ५ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

SCROLL FOR NEXT