Petrol Diesel Price SaamTV
देश विदेश

Petrol Diesel Price Hike: नवीन वर्षात पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या की, घटल्या? झटपट चेक करा

जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

वृत्तसंस्था

Petrol Diesel : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. मंगळवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींवरही त्याचा परिणाम दिसून आला आणि आज यूपीपासून राजस्थानपर्यंत अनेक शहरांमध्ये तेलाच्या किमती वाढल्या आहेत. मात्र, दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चारही महानगरांमध्ये आजही पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.(Petrol Diesel Latest Price)

सरकारी तेल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, आज पेट्रोल 35 पैशांनी महाग झाले आहे आणि यूपीच्या गौतम बुद्ध नगर (नोएडा-ग्रेटर नोएडा) मध्ये 97 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे, तर डिझेल 32 पैशांनी वाढून 90.14 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. याशिवाय, राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये आज पेट्रोलच्या दरात 83 पैशांनी वाढ झाली आहे आणि ती 109.31 रुपये प्रति लीटरवर पोहोचली आहे, तर डिझेल 75 पैशांनी महाग होऊन 94.47 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल.

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात. 

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bharli Gilki Recipe: गिलक्याची भाजी आवडत नाही? मग एकदा ट्राय करा झणझणीत भरली गिलकी, शुन्य मिनिटांत जेवण होईल फस्त

Balushahi Recipe: झटपट घरीच बनवा खुसखुशीत आणि रसाळ बालूशाही, वाचा सोपी रेसिपी

Pune Crime: पुण्यात धावत्या कारमध्ये महिलेवर बलात्कार; कोरेगाव पार्क परिसरातील मध्यरात्रीच्या थराराने खळबळ

मोठी बातमी! राज्यमंत्र्याचे निधन, भाजपवर कोसळला दु:खाचा डोंगर; राजकीय वर्तुळात शोककळा

Breast cancer: शरीरात ही 8 लक्षणं दिसली तर समजा ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो

SCROLL FOR NEXT