petrol diesel prices
petrol diesel prices Saam Tv
देश विदेश

Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर, जाणून घ्या दिल्लीसह प्रमुख शहरांमधील आजचे दर

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - भारतीय तेल कंपन्यांनी जवळपास दोन महिन्यांपासून पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरात कोणताही बदल केलेला नाही, त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती सातत्याने 100 डॉलरच्या आसपास आहेत.

सर्वसामान्यांना दिलासा देत केंद्र सरकारने मे महिन्यात पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 8 रुपयांनी आणि डिझेलवरील 6 रुपयांनी कमी केले होते. तेव्हापासून देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

हे देखील पाहा -

महाराष्ट्रात व्हॅट कपातीची घोषणा

नुकतीच महाराष्ट्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटमध्ये कपात केली होती, त्यानंतर राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले आहेत. राज्य सरकारने पेट्रोलवरील व्हॅटमध्ये 5 रुपयांनी आणि डिझेलवर 3 रुपयांनी कपात केली.

कच्च्या तेलाचे दर

कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 100 डॉलरच्या जवळपास आहे. सोमवारी, WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल102 डॉलरवर पोहोचली. तर ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 105 डॉलरवर दिसले. सरकारने उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर काही राज्यांनी व्हॅटही कमी केला. सरकारच्या या निर्णयामुळे पेट्रोलचे दर आठ रुपयांनी तर डिझेलचे दर सहा रुपयांनी कमी झाले आहेत.

आजचे भाव काय आहेत?

– पोर्टब्‍लेयरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर

– दिल्लीमध्ये पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईमध्ये पेट्रोल 106.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकातामध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर

– लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर

– जयपुरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर

– तिरुवनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 आणि डिझेल डीजल 96.52 रुपये प्रति लिटर

– पटनामध्ये पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर

– गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर

– बेंगलुरुमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर

– भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर

– चंडीगढ़मध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर

– हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारे तपासा

दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलचे दर हे दररोज बदलतात. हे बदललेले दर रोज सकाळी सहा वाजता जाहीर केले जातात.तुम्हाला जर हे रोजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर पाहायचे असतील तर खालीलप्रमाणे जाणून घेऊ शकता.

-SMS द्वारे पेट्रोल-डिझेलचे रोजचे नवीन दर देखील जाणून घेऊ शकता. यासीठ इंडियन ऑइलचे ग्राहक RSP 9224992249 या नंबरवर आणि BPSL ग्राहक 9223112222 या क्रमांकावर RSP पाठवून दराबाबतची माहिती मिळवू शकतात. तर, एचपीसीएल ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPP price किंमत जाणून घेऊ शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hema Malini And Dharmendra News : 'धर्मेंद्रपासून वेगळं राहून मी खूश...'; विभक्त राहण्यावर हेमा मालिनी यांचा खुलासा

Karnataka Crime News : सोबत फिरायला आली नाही; बहिणीच्या समोरच तरुणीला नराधमानं क्रूरपणे संपवलं

Pune Crime: कुख्यात गुन्हेगार हिरव्या, डड्याचा राडा; घरात घुसून एका कुटुंबाला दिली जिवे मारण्याची धमकी

Solapur Loksabha: प्रणिती शिंदे की राम सातपुते; विजयी गुलाल कोण उधळणार? मनसे- शरद पवार गटात लागली १ लाखाची पैज!

Kidney Problem: चेहऱ्यावर 'ही' लक्षण दिसल्यास त्वरीत उपचार घ्या; तुम्हाला 'हा' गंभीर आजार असू शकतो

SCROLL FOR NEXT