Petrol Diesel Price Saam Tv
देश विदेश

कच्चा तेलाच्या दरात पुन्हा घसरण; पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? जाणून घ्या आजचे दर

दोन दिवसांपासून कच्चा तेलाच्या किंमतीत सातत्याने घट होत आहे.

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली : गेल्या महिनाभरापासून आंतराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या (Crud Oil) किंमती वधारल्या होत्या. मात्र दोन दिवसांपासून कच्चा तेलाच्या किंमतीत सातत्याने घट होत आहे. शुक्रवारी सकाळी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाची किंमती कमी होऊन प्रतिबॅरेल 118 डॉलरवर पोहचली. कच्चा तेलाच्या किंमती कमी होताच भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel) दर जारी केले. (Petrol Diesel Price Today in Mumbai Maharastra)

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असताना सरकारी तेल कंपन्यांनी शुक्रवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले. शुक्रवारी सकाळी जारी केलेल्या दरांनुसार पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कुठलाही बदल करण्यात आला नाही. पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. नुकतेच सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याची घोषणा केली होती. यानंतर पेट्रोलच्या दरात कमाल 9 रुपयांनी तर डिझेलच्या दरात 7 रुपयांनी घट झाली होती.

अमेरिकन सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदर 0.75 टक्क्यांनी वाढवल्यानंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींवर परिणाम झाला आहे. ब्रेंट क्रूडची किंमत सध्या प्रति बॅरल 118.9 डॉलरवर आहे. दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले, मात्र आजही त्यांच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सुमारे अडीच महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरात कोणतीही वाढ झालेली नाही.

दरम्यान, शुक्रवारी सकाळी जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 96.72 रुपये इतका आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 109.27 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 97.28 रुपये एवढा आहे.

4 प्रमुख महानगरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर

मुंबई - मुंबईत पेट्रोल 109.27 रुपये आणि डिझेल प्रतिलिटर 95.84 रुपयांनी विकलं जातंय.

दिल्ली - दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 96.72 आणि डिझेलचा दर 89.62 इतका आहे.

चेन्नई - चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये प्रतिलिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रतिलिटर इतक्या दराने विकलं जातंय.

कोलकाता - कोलकत्यामध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.03 रुपये आणि डिझेल दर प्रतिलिटर 92.76 रुपये इतका आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Update: अचानक गायब झालेला मान्सून धो धो बरसतोय! कोणत्या जिल्ह्यांना धोका?

Mumbai Crime : तरुणीने डेटिंग ॲपवरून ओळख केली; हॉटेलमध्ये एकटं बोलावलं अन्...; बोरिवलीतील तरुणासोबत घडला भयंकर प्रकार

Maharashtra Live News Update : नाशिकच्या इगतपुरीत दरड कोसळली, आदिवासी पाड्यांचा संपर्क तुटला

Nashik Crime News: नाशिकमध्ये चड्डी गँगचा कहर; घरात घुसून ४ तोळे सोनं लंपास| VIDEO

Israel : इराणनंतर इस्रायलचा येमेनवर हल्ला, येमेनची 3 प्रमुख बंदरं उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT