PetrolPrice : तब्बल 8 रुपयांनी पेट्रोल स्वस्त; केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय
PetrolPrice : तब्बल 8 रुपयांनी पेट्रोल स्वस्त; केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय SaamTV
देश विदेश

PetrolPrice : तब्बल 8 रुपयांनी पेट्रोल स्वस्त; केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संतोष शाळिग्राम -

नवी दिल्ली : राज्यासह संपुर्ण देशाला पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी (Petrol and Diesel Price) हैराण केलं आहे. रोजच इंधन दरांमध्ये वाढ होण्याच्या बातम्या आपण वाचत असतो मात्र त्याच किंमती कमी केल्याच्या बातम्या आपण क्वचित पाहतो. आणि आणि दर कपात केलीच तर ती काही पैशांमध्ये असते. मात्र आज दिल्लीकरांना मात्र पेट्रोल दरांमध्ये मोठी दर कपात मिळाली आहे कारण दिल्लीत आज तब्बल 8 रुपयांनी पेट्रोल (Petrol) स्वस्त करण्यात आलं आहे.

हे देखील पहा -

पेट्रोलच्या दरात आज वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य दिल्लीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीच्या केजरीवाल सरकारने मोठा निर्णय घेत दिल्लीतील जनतेला दिलासा दिला आहे. दिल्लीत पेट्रोल 8 रुपयांनी स्वस्त करण्यासाठी सरकारने राज्यात व्हॅट कमी केला आहे.

महाराष्ट्रात स्वस्ताई कधी -

दिल्ली सरकारने (Delhi Goverment) पेट्रोलवरील व्हॅट (मूल्यवर्धित कर) 30% वरून 19.40% पर्यंत कमी केला आहे. त्यामुळे दिल्लीत पेट्रोलची किंमत सध्याच्या 103.97 रुपयांवरून 95.97 रुपयांपर्यंत खाली येईल. दिल्ली सरकारने आज कॅबिनेट बैठकीत पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट (VAT on Petrol and Diesel) कमी करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. दरम्यान आता दिल्ली सरकारणे केले महाराष्ट्रात इंधनांच्या दरांमध्ये कपात कधी?? असा प्रश्न राज्यातील जनता विचारत आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : मोठी बातमी! वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत आलेले काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांचा राजीनामा

Delhi News: दिल्ली पोलिसांची ७ राज्यात मोठी कारवाई; गोल्डी ब्रार टोळीच्या १० शार्प शूटर्सना अटक

JP Nadda: सात दिवसांत पोलीस ठाण्यात हजर व्हा, जेपी नड्डा यांना कर्नाटक पोलिसांची नोटीस

Name Astrology: z अक्षरापासून सुरू असलेल्या नावाचे लोक कसे असतात?

Rahul Gandhi : नरेंद्र मोदींच्या अदानी-अंबानींवरील विधानावर काँग्रेसचा पलटवार; राहुल गांधींनी थेट Video च शेअर केला

SCROLL FOR NEXT