Petrol Diesel Price SaamTV
देश विदेश

Petrol Diesel Price : धुळवडीच्या दुसऱ्या पेट्रोल डिझेल महागले; झटपट चेक करा इंधनाचे दर

Petrol Diesel Price News : जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

वृत्तसंस्था

Petrol Diesel Latest Price : गेल्या 24 तासात जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सुमारे 3 डॉलरने घसरल्या आहेत. दरम्यान, बुधवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये बदल दिसून येत आहेत. होळीच्या दिवशीही अनेक शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. (Latest Marathi News)

सरकारी तेल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, गाझियाबादमध्ये पेट्रोल 35 पैशांनी महाग होऊन 96.58 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे, तर डिझेल 33 पैशांनी वाढून 89.75 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. गुरुग्राममध्ये आज पेट्रोल (Petrol) 26 पैशांनी स्वस्त झाले असून ते 96.84 रुपये प्रति लिटर झाले आहे. तर डिझेल 24 पैशांनी घसरल्यानंतर 89.72 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये पेट्रोलचा दर 1.31 रुपयांनी वाढून 109.39 रुपये प्रति लिटर झाला आहे, तर डिझेल (Diesel) 1.19 रुपयांनी वाढून 94.55 रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल.

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात. 

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dearness Allowance: मोठी बातमी ! राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांना होळीचं गिफ्ट; ८ लाख निवृत्ती वेतनधारकांनाही होणार मोठा आर्थिक फायदा

IND vs ZIM T20 WC: झिम्बाब्वेचा दारूण पराभव; भारत उपांत्य फेरीपासून एक पाऊल दूर; हार्दिक बनला विजयाचा हिरो

रश्मिका मंदाना अन् विजय देवरकोंडा अकडले लग्न बंधनात; कपलची एक कृती ठरली चर्चेचा विषय

Rajya Sabha Election: उद्धव ठाकरे राज्यसभेवर जाणार? मविआमध्ये पडद्यामागे काय घडतेय?

Zilla Parishad: जिल्हा परिषद अन् पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर सदस्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT