रशियाच्या पर्म विद्यापीठावर गोळीबार, 8 जनांचा मृत्यू; पाहा Video Twitter
देश विदेश

रशियाच्या पर्म विद्यापीठावर गोळीबार, 8 जनांचा मृत्यू; पाहा Video

आज सकाळी, अज्ञात बंदुकधारांनी रशियातील पर्म शहरातील विद्यापीठात अंदाधुंद गोळीबार केला.

वृत्तसंस्था

आज सकाळी, अज्ञात बंदुकधारांनी रशियातील पर्म शहरातील विद्यापीठात अंदाधुंद गोळीबार केला. या अचानक झालेल्या गोळीबारात आठ जण ठार झाल्याची माहिती आहे. अधिकाऱ्यांच्या मते, या हल्ल्यात सहा जण जखमीही झाले आहेत. हल्ल्याच्या वेळी तेथे उपस्थित विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतःला खोल्यांमध्ये बंद केले होते.

विद्यापीठाचे प्रवक्ते आणि स्थानीक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पर्म विद्यापीठात गोळीबार केलेल्या बंदूकधारीला ताब्यात घेण्यात आले. या दरम्यान संशयित जखमीही झाला आहे. स्थानिक माध्यमांनी शेअर केलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये विद्यार्थी इमारतीतून बाहेर पडण्यासाठी पहिल्या मजल्यावरील खिडक्यांवरून उडी मारताना दिसत आहे.

रशियाच्या अंतर्गत मंत्रालयाने सांगितले की बंदूकधारीला नंतर ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेनंतर चौकशी समितीने घटनेचा तपास सुरू केला आहे. एजन्सीने सांगितले की, बंदूकधारीची ओळख विद्यापीठातील विद्यार्थी म्हणून झाली आहे. रशियामध्ये बंदुक ठेवण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. परंतु स्वरक्षणासाठी तुम्ही बंदूक खरेदी करुन जवळ ठेवू शकता.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri: काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत बुडून एकाच कुटुंबातील ४ मुलांचा मृत्यू

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचा मास्टर प्लॅन; रवींद्र चव्हाण मैदानात!

YouTuber Dhruv Rathee: यूट्युबर ध्रुव राठींची 20 तासांनंतर सुटका; राठींचा पोलिसांवर गंभीर आरोप

Tukaram Mundhe: MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आयुक्त तुकाराम मुंढेंवर सरकार सोपवणार नवी जबाबदारी

भाजपच्या तीन नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; काय आहे कारण? BJPच्या कारवाईनं राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT