Pegasus Scandal: चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालय करणार समिती स्थापन Saam Tv
देश विदेश

Pegasus Scandal: चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालय करणार समिती स्थापन

पेगासस घोटाळा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: पेगासस घोटाळा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या घोटाळ्याच्या चौकशी प्रकरणी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. पेगासस स्नूपिंग प्रकरणाच्या तपासासाठी आज गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश एन.व्ही. रामना V.N. Ramna म्हणाले की, ही समिती कशी असेल आणि तपास कसा पुढे जाईल याबाबत पुढील आठवड्यात सविस्तर आदेश येऊ शकतो. सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी न्यायालयात सांगितले की, काही तज्ज्ञांना समितीचा यासाठी संपर्क साधण्यात आला आहे.

सरन्यायाधीश एन.व्ही. रामना यांनी न्यायालयात वकील सीयू सिंह यांना सांगितले की पेगासस स्नूपिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय या आठवड्यात एक समिती स्थापन करू इच्छित आहे. सुनावणीदरम्यान मुख्य न्यायमूर्ती म्हणाले की, तांत्रिक तज्ज्ञांची समिती लवकरच अंतिम केली जाईल. तसेच यापूर्वी केंद्र सरकारकडून असे म्हटले गेले होते की या संपूर्ण प्रकरणाची तज्ञ समिती स्थापन करून चौकशी केली जाऊ शकते.

आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांच्या खुलाशानंतर खळबळ उडाली होती;

काही महिन्यापूर्वी पेगासस स्नूपिंग प्रकरणाचा मुद्दा समोर आला होता. आंतरराष्ट्रीय मीडिया एजन्सींनी Media Agencies दावा केला होता की, भारत सरकारने Indian Government इस्रायली स्पायवेअरच्या Israeli spyware आधारे देशातील अनेक राजकारणी, पत्रकार आणि इतर सेलिब्रिटींची हेरगिरी Spying करण्यात आलं होत. मात्र, केंद्र सरकारकडून हे प्रकरण समोर आल्यावर हे आरोप निराधार असल्याचे स्पष्टीकरण आले होते. या यादीत काँग्रेस खासदार राहुल गांधी, निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर आणि इतर नेते, अनेक पत्रकार आणि काही केंद्रीय मंत्र्यांची नावे होती.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे -सातारा महामार्गावर कंटेनरने ५ वाहनांना दिली धडक, ५ जण जखमी

Thane Crime: डिलिव्हरी बॉयला ड्रग्ज विकताना अटक, ४ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त

UPSC Recruitment: सरकारी नोकरीची संधी; UPSC ने जारी केली भरती; अर्ज कसा करावा?

Dhananjay Mundhe : दारू पिऊन सुसाट चालवली गाडी, धनंजय मुंडेंच्या समर्थकाचा प्रताप; VIDEO व्हायरल

Pune Rave Party Case : खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात मोठी अपडेट, खेवलकरांची उच्च न्यायालयात धाव, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT