Mehbooba Mufti Ani
देश विदेश

Mehbooba Mufti Accident: मेहबुबा मुफ्तींच्या कारला भीषण अपघात, पुढच्या भागाचा चेंदामेंदा; आग दुर्घटनाग्रस्तांच्या भेटीला जाताना घटना

Accident: जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांच्या कारचा अपघात झालाय. या अपघातात त्या थोडक्यात बचावल्या असून त्यांच्या कारचा अपघात काश्मीरच्या अनंतनाग येथे घडला.

Bharat Jadhav

Mehbooba Mufti Car Accident in Anantnag :

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांच्या कारचा अपघात झाला. हा अपघात अनंतनाग येथे झाला असून या दुर्घटनेत मेहबुबा मुफ्ती या थोडक्यात बचावल्या आहेत. मात्र त्यांच्या कार चालकाला दुखापत झाल्याचं सांगण्यात येत आहे. अनंतनागला जात असताना पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांच्या कारला आज अपघात झाला. मेहबुबा मुफ्ती आणि त्यांचे सुरक्षा अधिकारी यांना कोणतेही गंभीर दुखापत झालेली नसल्याची माहिती पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या मीडिया सेलने दिलीय.

जम्मू-काश्मीरमधील अनंतनागला जात असताना पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांच्या कारला आज अपघात झाला. मेहबुबा मुफ्ती आणि त्यांचे सुरक्षा अधिकारी यांना कोणतेही गंभीर दुखापत झालेली नसल्याची माहिती पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या मीडिया सेलने दिलीय. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका जुडणाऱ्या रस्त्यावर दोन कार एकमेकांना धडकल्याने हा अपघात घडला.

माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती ह्या खानबल येथे आग लागल्याच्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेल्या होत्या.आगीत जे लोक होरपळले आहेत, त्या लोकांची भेट घेण्यासाठी त्या खानबल येथे जात होत्या. त्याचवेळी त्याच्या कारचा अपघात झाला. या दुर्घटनेत मेहबुबा मुफ्ती बचावल्या आहेत, तर त्याच्या कार चालकाला आणि सुरक्षा रक्षकाला दुखापत झालीय. दरम्यान अपघात झाल्यानंतरही मुफ्ती ह्यांनी आपला दौरा कायम ठेवत त्या खानबल येथे गेल्या. मेहबुबा मुफ्ती ह्या सुरक्षित असून त्यांना कोणत्याच प्रकारची दुखापत झाली नाहीये, असं पीडीपीचे प्रवक्त्यांनी सांगितलं.

दोन दिवसापूर्वी अनंतनाग जिल्ह्यातील खानबल भागातील ८ घरांना आग लागल्याची घटना घडली होती. यात घरांचे मोठे नुकसान झालं होतं. एका अधिकाऱ्याने सांगितले की, बोट कॉलनी खानबल येथे सोमवारी रात्री अचानक आग लागली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अंबरनाथ नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी सदा मामा पाटील यांची निवड

Makeup Tips: ब्लश, ब्रॉन्झर आणि हायलाइटरमध्ये नेमका फरक काय?

Solapur Politics: मोठी बातमी! सोलापुरात भाजपकडून अजित पवारांना धक्का, मतदानाआधीच राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार फोडला

Makar Sankranti : मकर संक्रांतीला चंद्रासारखे खुलेल रूप, चमकदार अन् मऊ त्वचेसाठी 'गाजर'चा असा करा वापर

मी मुंबईत येणारच, हिंमत असेल तर पाय कापून दाखवा, के आन्नामलाई यांचे राज ठाकरेंना आव्हान

SCROLL FOR NEXT