crime news Saam Tv News
देश विदेश

घरातून पळून आली, ड्रायव्हरची वाईट नजर, २ दिवस बसमध्ये बलात्कार; परिसरात खळबळ

Nepali Woman Assaulted on Bus: पाटणामध्ये बसमध्ये दोन दिवस नेपाळी तरुणीवर बलात्कार; आरोपी ड्रायव्हर फरार. छत्रपती संभाजीनगरमधून आरोपी क्लीनरला अटक, पोलिसांची चौकशी सुरू.

Bhagyashree Kamble

  • पाटणामध्ये बसमध्ये दोन दिवस नेपाळी तरुणीवर बलात्कार; आरोपी ड्रायव्हर फरार.

  • छत्रपती संभाजीनगरमधून आरोपी क्लीनरला अटक, पोलिसांची चौकशी सुरू.

  • ड्रायव्हरने नोकरीचे आमिष दाखवून पीडितेला फसवले, बिसाप कॅम्प येथे नेले.

  • पीडित तरुणीने पोलिसात तक्रार दाखल करत आरोपीविरुद्ध गंभीर आरोप केले.

बिहारची राजधानी पाटणा येथून धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका नेपाळी तरूणीवर बसमध्ये दोन दिवस बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी औरंगाबादहून एका क्लीनरला अटक केली आहे. क्लीनर बलात्काराचा आरोप असलेल्या ड्रायव्हरसोबत होता. सध्या पोलिसांकडून क्लीनरची चौकशी केली जात आहे. दरम्यान, तरूणीवर बलात्कार करणारा आरोपी बस ड्रायव्हर फरार आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

कार्तिक असे आरोपी ड्रायव्हरचे नाव असल्याची माहिती आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी आरोपी चालकाने बस पाटण्यातील हार्डिंग रोडला नेले होते. तिथे त्यानं तरूणीसोबत गैरवर्तन केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, २५ वर्षीय पीडित तरूणी कुटुंबियांसोबत झालेल्या भांडणानंतर घरातून पळाली. ती पश्चिम बंगालमधील सिलिगुडी मार्गे ट्रेनने पटणा येथे पोहोचली.

स्थानकावर पोहोचल्यानंतर तिची ओळख ड्रायव्हरसोबत झाली. नोकरीची भुलथाप देत आरोपी तरूणीला बिसाप कॅम्प येथे घेऊन गेला. ड्रायव्हरनं तिला २ दिवस बसमध्येच ठेवले. नंतर तिच्यावर बलात्कार केला. तिनं नराधमाच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला.

नंतर तिनं थेट पोलीस ठाणे गाठले. तसेच आरोपी चालकाविरोधात तक्रार दाखल केली. ड्रायव्हरवर नेपाळी तरूणीने पैसे आणि मोबाईल लंपास केल्याचाही आरोप केला आहे. दरम्यान, आरोपी बस ड्रायव्हर दिल्लीतील रहिवासी असल्याची माहिती आहे. सध्या फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gadchiroli : थरारक! इमारत पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली; दुर्घटनेमध्ये ३ जणांचा जागीच मृत्यू

Beed Crime: कराड गँगची गुंडगिरी सुरूच;आधी पत्नीला मारहाण नंतर तरुणाला घासायला लावलं नाक, व्हिडिओ व्हायरल

Astro Tips For Money: पैशाच्या कमतरतेमुळे त्रस्त आहात? करा 'हे' उपाय, होईल भरभराट

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा धक्का बसणार, नाराज नेता शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर

Maharashtra Live News Update: गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथील इमारत कोसळली तीन जण जागीच ठार

SCROLL FOR NEXT