Baba Ramdev  Saam Tv
देश विदेश

Baba Ramdev: बाबा रामदेव यांना मोठा दणका! पतंजलीच्या 14 उत्पादनांवर बंदी

Uttarakhand News: बाबा रामदेव यांच्या पतंजली दिव्य फार्मसी कंपनीच्या १४ उत्पादनांवर बंदी घातलीय. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्याने या उत्पादनांवर बंदी घालण्यात आलीय.

साम टिव्ही ब्युरो

Baba Ramdev:

बाबा रामदेव यांच्या पतंजली दिव्य फार्मसी कंपनीच्या १४ उत्पादनांवर बंदी घातलीय. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्याने या उत्पादनांवर बंदी घालण्यात आलीय.

अत्यंत गाजावाजा करत योगगुरू बाबा रामदेव यांनी पंतजलीची वेगवेगळी उत्पादनं बाजारात आणली. आपली उत्पादनं इतरांपेक्षा वेगळी असून नैसर्गीक वनस्पतींपासून बनवण्यात आल्याचा दावाही केला. त्यासाठी कोट्यवधींच्या जाहिरातीही केल्या. मात्र पतंजलीच्या उत्पादनांचा पर्दाफाश झालाय. पतंजलीच्या एक दोन नव्हे तर तब्बल 14 उत्पादनांवर बंदी घालण्यात आलीय.

पतंजलीच्या ज्या उत्पादनांवर बंदी घालण्यात आली आहे त्यामध्ये पतंजली दृष्टी आय ड्रॉप, स्वसारी गोल्ड, स्वसारी वटी, ब्रॉन्कॉम, स्वसारी प्रवाही, स्वसारी अवलेह, मुक्ता वटी एक्स्ट्रा पॉवर, लिपिडॉम, बीपी ग्रिट, मधुग्रिट, मधुनाशिनी वटी एक्स्ट्रा पॉवर, लिवामृत अॅडव्हान्स, लिवोग्रिट आणि आयग्रिट गोल्ड यांचा सामावेश आहे.

उत्तराखंड सरकारनं ही कारवाई केलीय. याशिवाय योगगुरु बाबा रामदेव, आचार्य बाळकृष्ण आणि पतंजली यांच्या विरोधात ड्रग्ज आणि मॅजिक रेमेडीज कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी फौजदारी तक्रारही दाखल करण्यात आलीय. पतंजलीनं मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

महत्वाचं म्हणजे गेल्याच महिन्यात दिशाभूल जाहिराती केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं पंतजली आयुर्वेद कंपनीला चांगलंच फटकारलं होतं. तसच जाहीर माफी मागण्याचे आदेशही दिले होते. पंतजलीवर केवळ उत्पादनांच्याच फसवेगिरीचा आरोप नाही. तर जीएसटी विभागानेही पतंजलीला कारणे दाखवा नोटीस बजावलीय. आता यातून पतंजली धडा घेणार का? हेच पाहावं लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मला जे सोडुन गेले ते बरबाद झाले माझ्या नादी लागू नका - भाजपा सोडून गेलेल्यांना अशोक चव्हाण यांचा इशारा

Budh Uday: फेब्रुवारीपासून चमकणार या ३ राशींचं नशीब; 29 दिवसांनंतर बुध ग्रहाचा होणार उदय

Crime News : बाबा मला मासिक पाळी आलीये...मुलगी विनवण्या करत होती, पण पैशांना हपापलेल्या बापानं सौदा केला, शरीरसंबंध...

"डॅडी इज होम..."; डोळ्यावर गॉगल, एका हातात गन अन् दुसऱ्या हातात सिगार, यशच्या 'Toxic'चा टीझर आऊट; पाहा VIDEO

Pune Nagpur : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, पुणे ते नागपूर रेल्वे गाड्या २२ दिवस रद्द; कारण काय?

SCROLL FOR NEXT