London Train Video Saam TV
देश विदेश

London Train Video : भयंकर! ट्रेनच्या खिडक्या तोडून प्रवाशांनी काढला पळ; पाहा थरारक घटनेचा VIDEO

Smashed Train Windows : सदर व्हिडिओ पाहून अनेकांच्या काळजात धडकी भरलीये.

Ruchika Jadhav

London Train Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये एक ट्रेन रेल्वे स्थानकावर थांबली आहे. ट्रेन थांबली असून सर्व प्रवाशी या ट्रेनच्या काचा फोडताना दिसत आहेत. त्यानंतर आपला जीव वाचवत हे सर्वजण ट्रेनमधून बाहेर पडत आहेत. सदर व्हिडिओ पाहून अनेकांच्या काळजात धडकी भरलीये. (Latest Viral Video News)

मिळालेल्या माहितीनुसार, सदर व्हिडिओ हा लंडनमधील आहे. लंडनच्या एका रेल्वे स्थानकावर हा प्रकार घडला आहे. असं म्हटलं जात आहे की, ट्रेनमधील फायर अलार्म वाजला होता. तसेच ट्रेनमध्ये मोठ्या प्रमाणावर धूर झाला होता. एसी लोकल असल्याने ट्रेनचे दरवाजे बंद होते. हे दरवाजे बराच वेळ झाला तरी खुलत नव्हते. त्यामुळे आपला जीव वाचवण्यासाठी प्रवाशांना ट्रेनच्या खिडकीच्या काचा फोडाव्या लागल्या.

आपातकालीन परिस्थीतीमध्ये ट्रेनचे दरवाजे न उघडल्याने हा व्हिडिओ पाहून नागरिक राग व्यक्त करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये ट्रेनचे दरवाजे कसे उघडले नाहीत? असा प्रश्न सर्वजण विचारत आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सर्वांनीच राग व्यक्त केला आहे. हा व्हिडिओ जेक शार्प नावाच्या एका ट्विटर अकाउंटवर पोस्ट करण्यात आलाय.

घटना घडली तेव्हा फायर ब्रिगेडची वाहने देखील घटनास्थळी दाखल झाली होती. ट्रांसपोर्ट फॉर लंडन मार्फत घडलेल्या घटनेविषयी दिलगीरी व्यक्त करण्यात आली आहे. सदर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर लोक अशा प्रकारे खिडक्या तोडून नेमके का पळत होते याची ठोस माहिती समोर आलेली नाही.

ट्रांसपोर्ट फॉर लंडनने या विषयी अधिक माहिती देत म्हटलं आहे की, फायर ब्रिगेड घटनास्थळी पोहचल्यावर कोणत्याही प्रकारची आग लागली नव्हती असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आम्ही या प्रकरणी अधिक चौकशी करत आहोत, असं ट्रांसपोर्ट फॉर लंडन (London) मार्फत सांगण्यात अलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : पार्टनरसाठी पैसा खर्च करावा लागणार; प्रेमात वाद होणार; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Saturn Jupiter yog: 48 तासांनंतर पलटणार 'या' राशींचं नशीब; शनी-गुरु तयार करणार शतांक योग, मिळणार फक्त पैसा

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

SCROLL FOR NEXT