Indigo Flight Issue  Saam Tv
देश विदेश

Mumbai Airport Indigo Issue:'इंडिगो' प्रवाशांचे हाल; धावपट्टीवरच खाल्लं जेवण; विमानतळ प्रशासनाला केंद्राची नोटीस

IndiGo Viral Video: काही दिवसांपूर्वी काही प्रवाशांनी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीने जेवण केलं होतं. याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. याबाबत आता इंडिगो आणि मुंबई विमानतळाला केंद्र सरकारने नोटिस बजावली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Passengers Eating At Mumbai Airport

मुंबई विमानतळाच्या (Mumbai Airport) धावपट्टीवर प्रवाशांनी जेवण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यानंतर विमान वाहतूक मंत्रालयाने विमानतळ प्राधिकरण आणि इंडिगोला (Indigo) नोटीस बजावली होती. याप्रकरणी कारवाई सुरू करण्यात आल्याचे इंडिगोने आज सांगितलं आहे. एअरलाइनने सांगितलंय की, अंतर्गत तपासणी केली जाईल आणि तपासणीनंतर प्रोटोकॉलनुसार नोटीसचे उत्तर दिले जाईल. (latest marathi news)

प्रवाशांनी केलं धावपट्टीवर जेवण

14 जानेवारीला गोव्याहून दिल्लीला जाणारे विमान मुंबईकडे वळवण्यात आलं होतं. त्यानंतर प्रवासी धावपट्टीवर जेवण करताना दिसले. त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सोमवारी मध्यरात्री या संदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. इंडिगोचे (Indigo) दिल्लीकडे जाणारे विमान 6E2195 दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळावर उतरू शकले नाही. त्यामुळे ते रविवारी मुंबई विमानतळाकडे वळवण्यात आले होते.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

गोव्याहून दिल्लीला जाणारे इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवण्यात आल्याने प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये इंडिगोचे प्रवासी मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) जमिनीवर बसलेले दिसत आहेत. तसेच, या व्हिडिओमध्ये काही प्रवासी धावपट्टीवर अन्न खातानाही दिसत आहेत.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. युजर्समध्ये तो चर्चेचा केंद्रबिंदू बनला होता. हा व्हिडीओ (Indigo) पाहिल्यावर रात्रीची वेळ असल्याचं समजतंय. तिथे उभ्या असलेल्या इंडिगो विमानाजवळ काही लोकं जमिनीवर बसले असल्याचे स्पष्ट होतंय. कुणी जेवतंय, तर कुणी फोनवर बोलताना दिसत आहे.

विमानाला १२ तास उशीर

दाट धुक्यामुळं विमानाला उशीर झाला होता. त्यामुळं प्रवासी चिडल्याचं देखील समोर आलंय. एका प्रवाशाने पायलटला मारहाण केल्याची देखील घटना घडली होती. इंडिगो विमानाच्या पायलटला टेकऑफला उशीर झाल्यामुळे धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रवाशांना गोव्याहून दिल्लीला जायचे होते. गोवा-दिल्ली इंडिगो विमानाला सुमारे १२ तास उशीर झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: आई-वडील कामावर गेले, खेळता खेळता मुलं खड्ड्यात पडली; सख्ख्या बहीण-भावाचा बुडून मृत्यू

अभिषेक शर्मानं रचला इतिहास, ICC रँकिंगमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड; कुणालाही जमलं नाही ते करून दाखवलं!

Chanakya Neeti : वैवाहिक जीवनात कटकट, चीडचीड नको; तर 'या' चार गोष्टी लक्षात ठेवा

Maharashtra Live News Update: भांडुपमधील एका सार्वजनिक शौचालयात सापडलं स्त्री जातीचं अर्भक

Election Commission: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबरला आरक्षण सोडत

SCROLL FOR NEXT