Air India flight saam tv
देश विदेश

Air India Flight: आकाशात भिरभिरणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात उडाला एकच गोंधळ, घडलं असं काही की...

Passenger Misbehave With Crew Member: एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाकडून क्रू मेंबरसोबत गैरवर्तनाची ही दोन महिन्यातील दुसरी घटना आहे.

Priya More

Delhi Airport: एअर इंडियाच्या विमानात (Air India Fligt) क्रू मेंबरसोबत गैरवर्तन (misbehave with crew member) झाल्याची घटना समोर आली आहे. एका प्रवाशाने क्रु मेबरला शिवीगाळ करत मारहाण केली आहे. 29 मे रोजी ही घटना घडली. एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाकडून क्रू मेंबरसोबत गैरवर्तनाची ही दोन महिन्यातील दुसरी घटना आहे.

एअर इंडियाने एक निवेदन जारी करून सांगितले की, 29 मे रोजी एका प्रवाशाने आमच्या फ्लाइट AI882 मध्ये गैरवर्तन केले. आरोपी प्रवाशाने क्रू मेंबर्सना शिवीगाळ केली आणि त्यानंतर त्याने क्रू मेंबरवर हल्ला केला. दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर प्रवाशाचे आक्रमकपणे वागणे सुरूच ठेवले. त्यामुळे त्याला सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.

एअर इंडियाने सांगितले की, आम्ही नियामकालाही या घटनेची माहिती दिली आहे. याआधीही एप्रिल महिन्यात एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये एका प्रवाशाने क्रू मेंबरसोबत गैरवर्तन केले होते. 10 एप्रिल रोजी दिल्ली-लंडन फ्लाइटमधील एका प्रवाशाने दोन महिला केबिन क्रू मेंबर्ससोबत गैरवर्तन केले होते. या घटनेनंतर एअरलाइन्सने आरोपी व्यक्तीवर दोन वर्षांसाठी बंदी घातली होती.

एअर इंडियाच्या केबिन क्रू सुपरवायझरच्या तक्रारीवरून पोलिसांनी पंजाबमधील आरोपी प्रवासी जसकीरत सिंग पड्डा (२५) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. अलीकडे विमान प्रवासात गैरवर्तनाची प्रकरणे सतत समोर येत आहेत. 11 मे रोजी दिल्ली-कोलकाता इंडिगो फ्लाइटमध्ये एका महिला प्रवाशाने मद्यधुंद अवस्थेत क्रू मेंबरसोबत गैरवर्तन केले होते.

आरोपी महिलेला कोलकाता विमानतळावर सीआयएसएफच्या ताब्यात देण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रवासी महिलेचे नाव परमजीत कौर असून क्रू मेंबर्स आणि सहप्रवाशांना ती मद्यधुंद अवस्थेत आढळली. या महिलेने क्रू मेंबर तसेच इतर प्रवाशांशी गैरवर्तन केले. विमानतळावर उतरल्यानंतर आरोपी प्रवासी महिलेला सीआयएसएफ जवानांनी ताब्यात घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dark Circle Removal Tips: बर्फ लावल्याने खरचं डार्क सर्कल गायब होतात का? जाणून घ्या सत्य

नवी मुंबईत वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश, ग्राहकांकडून प्रति तास ४ हजार घ्यायचे; पोलिसांनी 'असा' रचला सापळा

Ratnagiri To Kolhapur Travel: रत्नागिरीहून कोल्हापूरला कसे जाल? वाचा सर्वोत्तम वाहतूक पर्याय आणि ट्रॅव्हल टिप्स

Maharashtra Live News Update : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

Gujarat Bridge Collapse Update : गुजरात पूल दुर्घटनेत मोठी अपडेट; चार अधिकाऱ्यांचं निलंबन, मृतांचा आकडा १८वर

SCROLL FOR NEXT