

महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी
४० स्टार प्रचारकांची अधिकृत यादी जाहीर केली
राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नेत्यांचा प्रचारात सहभाग
फक्त राज्यातीच नाही तर केंद्रातील नेत्यांचा स्टार प्रचारक यादीत समावेश
राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका संपून निकाल लागल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांनी आपला मोर्चा महापालिका निवडणुकीकडे वळवला आहे. राज्यातील २९ महानगरापालिकांच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कबंर कसली आहे. काँग्रेस पक्षाने देखील जय्यत तयारी केली आहे. आढावा बैठका आणि रणनितीवर सविस्तर चर्चा केल्यानंतर आता ४० स्टार प्रचारकांची यादी काँग्रेसने जाहीर केली आहे.
स्टार प्रचारकांच्या यादीत प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार, खासदार छत्रपती शाहू महाराज, विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनीक, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात, तेलंगणाचे मंत्री मोहम्मद अझरुद्दीन, खासदार रजनीताई पाटील या सर्वांचा समावेश आहे.
त्याचसोबत, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढी, राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे, अखिल भारतीय कार्य समितीचे सदस्य नसीम खान, अभिनेते व काँग्रेस नेते राज बब्बर, अखिल भारतीय कार्य समितीच्या सदस्या यशोमती ठाकूर, खासदार प्रणिती शिंदे, आमदार अमिन पटेल, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, माजी मंत्री सुनिल केदार, आमदार अमित देशमुख, आमदार विश्वजित कदम, आमदार भाई जगताप हे देखील आपल्या उमेदवारांसाठी प्रचार करणार आहेत.
दरम्यान, नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे ५१ नगराध्यक्ष निवडून आले. यामध्ये काँग्रेसचे सर्वात जास्त म्हणजे ३४ नगराध्यक्ष निवडून आले आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाचे ९ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ८ नगराध्यक्ष निवडून आले. महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत पूर्णपणे वर्चस्व पाहायला मिळाले. २८८ जागांपैकी २२४ ठिकाणी महायुतीचे नगराध्यक्ष निवडून आले. यामध्ये एकट्या भाजपचे १२० नगराध्यक्ष निवडून आले. तर शिवसेना शिंदे गटाचे ५६ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ३६ नगराध्यक्ष निवडून आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.