Viral Video  Saam TV
देश विदेश

Viral Video : साई चरणी नतमस्तक होताच मृत्यूने कवटाळले; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायर

दर्शन घेताना नतमस्तक झाल्यावर त्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाल्याचे म्हटले आज आहे.

साम टिव्ही ब्युरो

Viral Video : मध्य प्रदेशमधून एक दु:खद वृत्त समोर येत आहे. साईंच्या दर्शनासाठी गेलेल्या एका भाविकाचा मंदिरातच मृत्यू झाला आहे. दर्शन घेताना नतमस्तक झाल्यावर त्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाल्याचे म्हटले आज आहे. मृत व्यक्तीचे नाव राकेश मेहाणी असे आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, राकेश गुरुवारी मध्य प्रदेशच्या कटनी येथे साईमंदिरात आले होते. दर्शन घेताना ते नतमस्तक झाले आणि तिथेच त्यांनी जीव सोडला. ते बराच वेळ खाली वाकून होते. त्यामुळे मंदिरातील (Temple) पुजाऱ्यांनी त्यांना आवाज दिला. मात्र त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे नीट पाहिले असता. त्यांचा मृत्यू झाल्याचे समजले. उपस्थित व्यक्तींनी तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले तेव्हा, हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या धक्कादायक घटनेने परिसरात शोकाकुल वातावरण पसरले आहे. वयाच्या ४२ व्या वर्षी राकेश यांचा मृत्यू झाला. सदर घटना मंदिरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. शनिवारी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. सध्या व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. राकेश यांच्या अशा मृत्यूवर अनेक साई भक्त शोक व्यक्त करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vinod Tawde: एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है, काँग्रेसच्या आरोपांवर विनोद तावडेंचं उत्तर

Beed Politics: प्रचारात रंगलीय डुक्कर मारण्याची चर्चा, आष्टीतील उमेदवारांचे एकमेकांना चॅलेंज

Nanded News : आगीत दोन घरांसह गोठा जळून खाक; ८ शेळ्यांचा मृत्यू, संसाराची राखरांगोळी

जगातील सर्वात महागडा तांदूळ तुम्हाला माहितीये का? पाहा काय आहे किंमत

Raj Thackarey News : हिंदुत्वाला तडा घालण्याचं काम शरद पवारांनी केलं; लालबागमधून राज ठाकरेंचा घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT