Narendra Modi Vs Rahul Gandhi Saam Digital
देश विदेश

Rahul Gandhi Speech: हिंदू, हिंसा, द्वेष... राहुल गांधींच्या ९० मिनिटांच्या भाषणातून मोठे मुद्दे गायब; सभापतींनी चालवली कात्री!

Issues from Rahul Gandhi's Parliament Session 90-minute speech were removed from the record: वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांनी सुमारे एक तास ४० मिनिटे भाषण केले. यावेळी त्यांच्या काही विधानांवर मोठा गोंधळ झाल्याचेही पाहायला मिळाले. आता राहुल गांधी यांच्या भाषणावर आक्षेप घेत काही शब्द संसदीय कार्यवाहीतून वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Gangappa Pujari

दिल्ली, ता. २ जुलै २०२४

संसदीय अधिवेशनाचा कालचा दिवस विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भाषणाने गाजवला. लोकसभा निवडणुकीत भाजपची पीछेहाट, अयोध्येतील पराभव, नीट परीक्षा घोटाळा, राममंदिर अशा अनेक मुद्द्यांवरुन राहुल गांधींनी मोदी सरकारवर तोफ डागली. तब्बल ९० मिनिटे राहुल गांधींनी भाषण ठोकले.

त्यांच्या या भाषणावर सत्ताधाऱ्यांनी वेळोवेळी आक्षेप घेतला. त्यांच्या हुिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन मोठा गोंधळही पाहायला मिळाला होता. आता राहुल गांधी यांच्या भाषणावर आक्षेप घेत काही शब्द संसदीय कार्यवाहीतून वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

राहुल गांधींच्या भाषणावर कात्री

राहुल गांधी यांनी सोमवारी लोकसभेत भाजपवर तुटून पडले. वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांनी सुमारे एक तास ४० मिनिटे भाषण केले. यावेळी त्यांच्या काही विधानांवर मोठा गोंधळ झाल्याचेही पाहायला मिळाले. अशातच आता राहुल गांधी यांच्या भाषणातील काही भाग संसदेच्या कामकाजाच्या रेकॉर्डमधून काढून टाकण्यात आले आहेत.

हे मुद्दे हटवले!

राहुल गांधींचे हिंदू आणि हिंसेबाबतचे वक्तव्य संसदेच्या कामकाजातून काढून टाकण्यात आले आहे. तसेच 'मी जेव्हा पीएम मोदींकडे पाहतो तेव्हा ते हसत नाहीत,' असे राहुल गांधी म्हणाले होते. त्यांचे हे विधानही लोकसभेच्या कामकाजातून काढून टाकण्यात आले. राहुल गांधींचे अंबानी आणि अदानी यांच्याबाबतचे वक्तव्यही काढून टाकण्यात आले.

कोटामधील संपूर्ण परीक्षा केंद्रीकृत आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. त्यांची ही टिप्पणीही काढून टाकण्यात आली आहे. भाजपकडून अल्पसंख्याकांना अन्यायकारक वागणूक देण्याबाबत राहुल गांधी यांचे भाषण काढून टाकण्यात आले. तसेच अग्निवीर ही सेनेची नसून पीएमओची योजना असल्याचे राहुल गांधींचे विधान संसदेच्या कामकाजातून काढून टाकण्यात आले. भाजप २४ तास द्वेष आणि हिंसाचार पसरवते असेही ते म्हणाले होते. राहुल गांधींच्या या वक्तव्यावरही कात्री लावण्यात आली आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sakshee Gandhi: थोडीशी लाजली अन् गालातच हसली; अभिनेत्रीचं मोहक सौंदर्य

Shravan Special : श्रावणात चिकन-मटणाची चव येतेय? मग ही डुबुक वडी रेसिपी एकदा बनवाच

तेजस्विनी पंडितने आईला दिला मुखाग्नी, अखेरचा निरोप देताना अश्रू अनावर; राज ठाकरेंची उपस्थित! VIDEO

Narendra Modi : डोक्यावर संविधान ठेवून नाचणारे राजकारणी आधी पायदळी तुडवायचे; PM नरेंद्र मोदींचा विरोधकांवर निशाणा

Viral Video: जुगाड असावा तर असा! महिलेने तुटलेल्या कॅसरोल बॉक्सचा केला अनोखा वापर, व्हिडीओ पाहून विश्वास बसणार नाही

SCROLL FOR NEXT