Papua New Guinea Landslide Saam Tv
देश विदेश

Papua New Guinea Landslide: साखर झोपेत असताना अख्खं गावच संपलं; दरड कोसळली, ३०० लोक मलब्याखाली

Papua New Guinea Landslide Update: पापुआ न्यू गिनीआतील एका गावावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये हजारो घरं गाडली गेली आहेत.

Rohini Gudaghe

पापुआ न्यू गिनीआमधील एक गाव रात्री झोपलं, त्याची सकाळच झाली नाही. कारण पहाटे साखर झोपेत असतानाच गावावर दरड कोसळली. गावकऱ्यांना काही कळायच्या आतमध्येच मात्र सगळं काही संपलं होतं. याबाबत सविस्तर वृत्त असं की, उत्तर पापुआ न्यू गिनीआमध्ये भूस्खलन झालं आहे. या भूस्खलनामुळे ३०० हून अधिक लोकं आणि १०० पेक्षा अधिक घरे गाडली गेली आहेत, अशी माहिती ऑस्ट्रेलियातील स्थानिक माध्यमांनी आज दिली आहे. राजधानी पोर्ट मोरेस्बीपासून अंदाजे ६०० किमी वायव्येस असलेल्या एन्गा प्रांतातील काओकलम गावात ही नैसर्गिक आपत्ती आली आहे.

शुक्रवारी (२४ मे) पहाटे तीन वाजता काओकलम गावात दरड कोसळल्याची माहिती. पापुआ न्यू गिनीआ पोस्ट कुरिअरने या भूस्खलनात १ हजार १८२ घरे गाडले गेल्याची माहिती दिली आहे. गाव भल्या पहाटे साखर झोपेत असताना ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत तीनशे लोक मलब्याखाली दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे, तर हजारो घरं जमीनदोस्त (Australia Landslide) झाल्याची माहिती मिळत आहे.

ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र व्यवहार आणि व्यापार विभागाने आज दिलेल्या माहितीनुसार, प्रांतातील मुलिताका भागात झालेल्या भूस्खलनामुळे सहाहून अधिक गावांना फटका बसला आहे. DFAT च्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटलंय की, पोर्ट मोरेस्बी येथील ऑस्ट्रेलियाचे उच्चायुक्तालय पीएनजी अधिकाऱ्यांशी जवळच्या संपर्कात आहे. वित्तहानी आणि जीवितहानी किती प्रमाणात (Papua New Guinea Landslide) झाली आहे, यासंबंधीचे अधिक मूल्यांकन करण्यात येत आहे.

ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पने दिलेल्या माहितीनुसार, आपत्कालीन टीम तात्काळ या भागात पोहोचली. त्यानंतर आता या भागातून चार मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत (Papua New Guinea) आहे. भूस्खलनाने सर्व रस्ते बाधित झाले आहेत. त्यामुळे आता या भागात पोहोचण्यासाठी हेलिकॉप्टर हा एकमेव पर्याय असल्याची माहिती डेक्कन हेरल्डच्या हवाल्यामुसार मिळत आहे.

या दुर्घटनेसंबंधी (Landslide) अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर येत आहे. या फुटेजमध्ये लोकं खडकांवर, उन्मळून पडलेल्या झाडांखाली आणि मातीच्या ढिगाऱ्यांखाली आपल्या नातेवाईकांचा शोध घेत असल्याचं दिसत आहे. या ठिकाणी महिलांचे रडतानाचे आवाज ऐकू येत आहेत. देशाते पंतप्रधान जेम्स मारापे यांनी आपत्ती अधिकारी, संरक्षण दल, बांधकाम, महामार्ग विभाग मदत आणि घटनास्थळी बचावकार्य करत असल्याची माहिती दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : संतोष देशमुख हत्या प्रकरणाला सुरूवात, उज्वल निकम न्यायालयात दाखल

Dindyachi Bhaji Recipe : दींडाची गावरान चमचमीत भाजी बनवण्याची पारंपारिक पद्धत जाणून घ्या

Rabies Symptoms: रेबीज म्हणजे काय आणि तो का होतो? सुरुवातीची लक्षणे कोणती?

Shocking: सूनेची क्रूरता! आईसोबत मिळून सासूला झोडलं, जमिनीवर पाडून झिंज्या उपटल्या; VIDEO व्हायरल

Nagpur : निर्माल्य टाकण्यासाठी पुलावर थांबले; पतीने सोबत सेल्फी काढताच पत्नीची नदीत उडी, महिलेचा मृत्यू

SCROLL FOR NEXT