Panchkula Ravan Dahan Saam Tv
देश विदेश

Panchkula Ravan Dahan: १७१ फूट उंच, १८ लाखांचा खर्च; पंचकुलात होणार रावणाच्या सर्वात उंच पुतळ्याचं दहन

Priya More

Haryana Ravan Dahan:

आज सकळीकडे दसऱ्याचा (Dasara) उत्साह पाहायला मिळत आहे. दसरा म्हणजेच विजयादशमीचा (Vijayadashmi) सण संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दसऱ्याच्या दिवशी रावण आणि त्याचे दोन भाऊ मेघनाथ आणि कुंभकरण यांचे पुतळे ठिकठिकाणी बनवून त्यांचे दहन (Ravan Dahan) केले जाते.

वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवण्यासाठी देशभरामध्ये ठिकठिकाणी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. भारतामध्ये अनेक शहरं आहेत ज्याठिकाणी रावण दहनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा रावण दहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी पर्यटक मोठ्यासंख्येने येत असतात.

दरवर्षी दसऱ्याच्या निमित्ताने काही स्पर्धांचेही आयोजन केले जाते. त्यामधील सर्वात मोठी स्पर्धा म्हणजे रावणाचा पुतळा बनवण्याची स्पर्धा. यावर्षी पंचकुलामध्ये देशातील सर्वात मोठा रावणाचा पुतळा तयार करण्यात आला आहे. या पुतळ्याची उंची 171 फूट आहे. हा पुतळा देशभरात आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे. आज दसऱ्याच्या मुहूर्तावर रावणाच्या या पुतळ्याचे दहन करण्यात येणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पंचकुलाच्या सेक्टर ५ येथील शालीमार मैदानावर रावण दहनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाची तयारी सुरू झाली आहे. हा कार्यक्रम पंचकुलाच्या श्री माता मनसा देवी चॅरिटेबल ट्रस्ट आणि श्री आदर्श रामलीला ड्रॅमॅटिक क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला जात आहे. या रावणाचा पुतळा तयार करण्यासाठी एकूण 18 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

रावणाचा हा पुतळा तयार करण्यासाठी 25 कारागिरांना एकूण 3 महिने लागले. हा पुतळा तयार करण्यासाठी जवळपास २५ क्विंटल लोखंड, ५०० बांबू, ३ हजार मीटर लांब चटई आणि ३५०० मीटर कापडाचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय रावणाचा चेहरा बनवण्यासाठी सुमारे 1 क्विंटल फायबरचा वापर करण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.

त्याचप्रमाणे, पर्यावरणाचा विचार करून रावणाच्या आत इको-फ्रेंडली फटाके बसवण्यात आले आहेत हे फटाके तामिळनाडूतून आणण्यात आले आहेत. रावणाच्या या भव्य पुतळ्याचे दहन रिमोटद्वारे केले जाणार आहे. रावण दहनाच्या आधी या कार्यक्रमात भजन आणि कीर्तनही गायले जाईल. दरवर्षीप्रमाणे यावेळी देखील हा रावण दहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT