Barack Obama Israel Hamas War : अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांचा इस्राइलला इशारा, 'गाझावरील हल्ले थांबवा, अन्यथा...'

Israel Hamas War Update : गाझावरील हल्ल्याचे परिणाम इस्रायलला भोगावे लागतील, असं बराक ओबामा यांनी म्हटले आहे.
Barack Obama Israel Hamas War
Barack Obama Israel Hamas War Saam TV
Published On

Israel-Hamas War :

इस्राइल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या युद्धाचा आज १८वा दिवस आहे. हमानने दहशतवादी हल्ल्यानंतर इस्राइलने आक्रमक पवित्रा घेत गाझा पट्टीत प्रतिहल्ला चढवला आहे. मात्र एवढ्या दिवसांनंतरही हे युद्ध सुरुच आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी इस्त्रायलने हमासवर केलेल्या हल्लावरुन इशारा दिला आहे. गाझावरील हल्ल्याचे परिणाम इस्रायलला भोगावे लागतील, असं बराक ओबामा यांनी म्हटले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बराक ओबामा यांनी इस्रायलला संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. इस्रायलने युद्धात गाझातील कारवाई मानवतेच्या दृष्टीने थांबवली नाही तर त्याचे परिणाम त्यांना भोवावे लागू शकतात. (Latest News)

Barack Obama Israel Hamas War
Israel-Hamas War:रस्त्यांवर वाहनं थांबत केला गोळीबार; इस्राइलमधील हमासच्या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल

इस्रायलने गाझा पट्टीवर हल्ला करणे सुरूच ठेवले तर त्यांना जागतिक स्तरावर मिळत असलेला पाठिंबा कमी होईल. ज्याचा वापर शत्रू देशांना त्यांच्या बाजूने वातावरण निर्माण करण्यासाठी केला जाऊ शकतो, असं ओबामा यांनी म्हटलं.

गाझामधील नागरिकांसाठी अन्न, पाणी आणि वीज पुरवठा खंडित करण्याच्या इस्रायल सरकारच्या निर्णयामुळे पॅलेस्टिनी नागरिक आणखी कठोर होऊ शकतात. गाझावरील हल्ल्यामुळे प्रदेशात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी इस्रायलच्या दीर्घकालीन प्रयत्नांना खीळ बसेल, असंह बराक ओबामा यांनी म्हटलं.

Barack Obama Israel Hamas War
Israel Air Strike : इस्रायलचा पॅलेस्टाईनवर पुन्हा एअर स्ट्राईक, गाझा पट्टीमध्ये आतापर्यंत 4,651 लोकांचा मृत्यू

गाझामधील परिस्थिती भीषण

इस्रायल-हमास युद्धात दोन्ही बाजूंनी आतापर्यंत सुमारे ५००० लोकांचा मृत्यू झाला आहे. गाझा पट्टीमध्ये सर्वात मोठा विनाश पाहायला मिळत आहे. इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमुळे गाझा पट्टीत ३ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यावरुन इस्रायलवर टीका होत आहे. इस्रायलचे म्हणणे आहे की जोपर्यंत हमासचे सर्व तळ नष्ट होत नाहीत तोपर्यंत हा हल्ला सुरूच राहील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com