Pakistani Boy Singing Bollywood Song Viral Video Saamtv
देश विदेश

Viral Video: आवाज ऐकाल तर फॅन व्हाल! तरुणाने लग्नात गायले Romantic गाणे, नवरी झाली फिदा; Video तुफान व्हायरल

आपल्या होणाऱ्या बायकोसाठी नवरदेवाने गायलेल्या या गाण्याच्या व्हिडिओने नेटकऱ्यांना वेड लावले आहे.

Gangappa Pujari

Pakistani bride Viral Video: कच्चा बदाम गाणारा भुवन बड्याकर असो किंवा बसपण का प्यार मधला सहदेव असो, सोशल मीडियावर टाकलेल्या एका छोट्याशा व्हिडिओने अनेकांना स्टार केले आहे. या कलाकारांच्या आवाजाने अवघ्या देशाला वेड लावले होते.

सध्या सोशल मीडियाव अशाच एका व्हिडिओची तुफान चर्चा रंगली आहे. ज्यामधील नवरदेवाने आपल्या लग्नात गाणे गायल्याचे दिसत आहे. या तरुणाच्या आवाजाचे नेटकऱ्यांनी तोंडभरुन कौतुक केले आहे. (Viral Video)

सोशल मीडियावर लग्नातील अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी डान्स करतानाचा तर कधी नवरदेवाच्या मस्तीचा व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतो. सध्या अशाच एका नवरदेवाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो लग्नात आपल्या होणाऱ्या बायकोसाठी गाणे गाताना दिसत आहे.

गाण्यातील तरुणाच्या आवाजाने नेटकऱ्यांना अक्षरशः वेड लावले असून सोशल मीडियावर त्याच्या आवाजाचे जोरदार कौतुक होताना दिसत आहे.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार , व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाकिस्तानमधला (Pakistan) आहे. आपल्या लग्नाचा दिवस खास करण्यासाठी या तरुणाने होणाऱ्या नवरीसाठी फनामधील कैलाश खेर यांचे चांद सिफारिश रोमँटिक गाणे गाताना दिसत आहे. त्याच्या आवाजाने सर्वांनाच वेड लावले आहे. हा व्हिडिओ सध्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रचंड व्हायरल होत आहे.

हे गाणे अभिनेता आमिर खान आणि काजोल यांच्यावर चित्रित करण्यात आले होते.

सामी रशीद ऑफिशियल नावाच्या इंटरनेट यूजरने ही क्लिप इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. 14 डिसेंबर रोजी शेअर केल्यापासून, व्हिडिओला 2.9 दशलक्ष व्ह्यूज आणि अनेक लाईक्स मिळाले आहेत. या शेअरवर नेटिझन्सच्या कमेंट्सचाही धुमाकूळ घातला आहे. नेटकऱ्यांनी या तरुणाच्या जादूई आवाजाचे कौतुक केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supplements: 'हे' सप्लीमेंट्स चुकूनही एकत्र घेऊ नका नाहीतर, आरोग्यावर होईल परिणाम

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा झटका, नाना पटोले यांचे निकटवर्तीय भाजपात जाणार

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

SCROLL FOR NEXT