PM Modi Warn Pakistan saam tv
देश विदेश

PM Modi: 'भारत दहशतवाद्यांचा फणा ठेचेल'; भारताचा पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा

PM Modi Warn Pakistan : भारतानं पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा दिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भरसभेत पाकच्या दहशतवाद्यांना काय ठणकावून सांगितलयं. पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुप्रिम मसकर, साम प्रतिनिधी

भारतानं पाकिस्तानला दहशतवादाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा खडसावलयं. पहलगाम हल्ल्याची पाकिस्ताननं जबाबादारी नाकारली तरी भारतानं पाकच्या नापाक मनसुब्यांचे एकएक पुरावे जगासमोर मांडून पाकची पुरती कोंडी केली. तरी पाकिस्तानच्या नेत्यांची मस्ती काही जिरली नाहीये. त्यांची मुक्ताफळ सुरूच आहेत. त्यामुळेच भारतानं पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा दिलाय.

एकीकडे पंतप्रधानांनी पाकला निर्वाणीचा इशारा दिलाय. तर दुसरीकडे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरच्या विध्वसांची पुन्हा आठवण करू दिलीय. पाकमधल्या 9 दहशतवादी तळांना बेचिराख केल तर 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा पुनरुच्चार संरक्षणमंत्र्यांनी केला.

भारताच्या सार्वभौमत्त्वाला धक्का लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकला ऑपरेशन सिंदूरनं चांगलाच धडा शिकवला. मात्र तरीही पाकचे नापाक मनसुबे अद्याप थांबलेले नाहीत. त्यामुळे पाकशी दहशतवादावर आणि पीओकेवर चर्चा होईल, हीच भारताची भूमिका आहे. मात्र भारताच्या शांततेला भंग करून पाकनं संयमाचा अंत पाहू नये. कारण संघर्षाची धग पाकची धुळधाण करून टाकले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT