Pakistan Supreme Court orders
Pakistan Supreme Court orders  saam tv
देश विदेश

Imran Khan News: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा, तात्काळ सुटकेचे आदेश

Chandrakant Jagtap

Pakistan Supreme Court orders immediate release of former PM Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने त्यांची अटक बेकायदेशीर ठरवत त्यांची तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने (Pakistan Supreme Court) इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयात जाण्याचे आदेश दिले आहेत.

याआधी सुप्रीम कोर्टाने इम्रान खानला तासाभरात हजर करण्याचे आदेश दिले होते. यानंतर पोलीस इम्रान खान यांना घेऊन कोर्टात (Pakistan Supreme Court) पोहोचले. तत्पूर्वी न्यायालयाने म्हटले होते की भविष्यासाठी आदर्श ठेवण्याची वेळ आली आहे. पाकिस्तानला जेल होऊ देणार नाही.

इम्रान खान यांनी ठोठावला होता सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा

इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या अटकेच्या आदेशाविरोधात इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. इम्रान खानची अटक वैध ठरवणारा इस्लामाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करण्याच्या याचिकेविरोधात पीटीआयने सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. उच्च न्यायालयाचा हा आदेश घटनेच्या कलम १० अ च्या विरोधात असल्याचे या याचिकेत म्हटले आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय विरोधाभासांनी भरलेला आहे, असे याचिकेत म्हटले आहे. SC मधील याचिकेत NAB च्या अध्यक्षांनी जारी केलेले वॉरंट बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. (Breaking News)

पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात निदर्शने

पाकिस्तानातील अनेक मोठ्या शहरांमध्ये इम्रान खानचे समर्थक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून निदर्शने करत आहेत. या अटकेमुळे सरकारविरोधात संताप व्यक्त व्हायला हवा होता, पण पीटीआय समर्थकांनी याउलट लष्करावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. आंदोलकांनी लष्करी प्रतिष्ठानांवर, त्यांच्या कार्यालयांवर आणि घरांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. (Latest Political News)

14 सरकारी इमारती, पोलिसांची 21 वाहनं जाळली

पाकिस्तान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाबमध्ये गेल्या दोन दिवसांत आंदोलकांनी 14 सरकारी इमारती आणि 21 पोलीस वाहनं जाळली आहे. मंगळवारी आंदोलकांनी लाहोरमधील कॉर्प्स कमांडरच्या घराचीही तोडफोड केली. पीटीआयचे प्रमुख इम्रान खान यांच्या अटकेमुळे संतप्त झालेले त्यांचे समर्थक रस्त्यावर गोंधळ घालत आहेत. या हिंसक संघर्षांमध्ये आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 300 जण जखमी झाले आहेत. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

Lok Sabha Election: तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?

MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला! शतकी खेळीनं मुंबईच्या लल्लाटी विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली

Esha Gupta च्या बोल्ड फोटोंची एकचं चर्चा, फोटो पाहून चाहते थक्क

Custard Apple Benefits : डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी सीताफळ उपयुक्त; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

SCROLL FOR NEXT