Pakistan siege Baloch Army also inflicted Saam Tv News
देश विदेश

India-Pakistan Tension : पाकची घेराबंदी, बलुच आर्मीनेही घातला घाव; आता पाकचे तुकडे-तुकडे होणार?

Pahalgam Terror Attack : आता पुन्हा 1971 ची पुनरावृत्ती होणार आणि पाकचे तुकडे तुकडे होणार.....हे आम्ही का म्हणतोय? त्याची कारणं काय आहेत? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये....

Prashant Patil

भरत मोहोळकर, साम टीव्ही

नवी दिल्ली : भारताची कुरापत काढणाऱ्या पाकिस्तानची आता चहुबाजूंनी कोंडी झालीय. त्यामुळे आता पाकिस्तानचे तुकडे तुकडे होणार हे निश्चित. कारण बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील मंगोचर आणि कलात शहरं ताब्यात घेतल्याचा दावा करत चीन आणि पाकिस्तानला थेट इशारा दिलाय.

पहलगाम हल्ल्यामुळे संतापलेला भारत पाकिस्तानवर कोणत्याही क्षणी हल्ला कऱण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाकिस्तानला घाम फुटलाय. त्यातच बलुच लिबरेशन आर्मीने स्वतंत्र तालिबानची मागणी करत पाकिस्तान सैन्यावर हल्लाबोल केलाय. तर मंगोचर आणि कलात शहरातील सरकारी इमारती, सैन्याचे ठाणे आणि क्वेटा महामार्ग ताब्यात घेतल्याचं समोर आलंय. मात्र, बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी का होत आहे? पाहूयात.

पाकिस्तानमधील सर्वात मोठं राज्य

बलुचिस्तानच्या सीमेवर इराण आणि अफगाणिस्तान

बलुचिस्तान नैसर्गिक खनिजसंपत्तीने समृद्ध

खनिजसंपत्तीचा फायदा स्थानिकांना मिळत नसल्याचा आरोप

CPEC च्या ग्वादर बंदर प्रकल्पाच्या फायद्यापासून स्थानिक वंचित

बलुच संस्कृतीची गळचेपी

बलोची भाषेऐवजी उर्दू आणि पंजाबी लादण्याचा प्रयत्न

खरंतर १९४७ पासून बलुचिस्तानमध्ये विद्रोहाचे निखारे धगधगत आहेत... त्यात १९४८, १९७० आणि २००२ मध्ये मोठे विद्रोह झाले.. मात्र आता पुन्हा एकदा बलुचिस्तानमध्ये विद्रोहाची ठिणगी पडलीय.. त्यामुळे पाकची एकाच मोर्चावर नाही तर चहुबाजूंनी कोंडी करण्यात आलीय...

खैबर पख्तूनख्वा मध्ये तहरिक ए तालिबानचा पाकिस्तान सैन्यावर हल्ला

बलुचिस्तान लिबरेशन आर्मीकडून जफर एक्सप्रेस हायजॅक आणि आता 2 शहरं ताब्यात

अरबी समुद्रात भारतीय नौदलाकडून पाकची कोंडी

१९७१ मध्ये मुक्तीवाहिनी संघटनेला मदत करत भारताने एका घावात पाकिस्तानचे २तुकडे केले आणि बांग्लादेश स्वतंत्र झाला.. आता पुन्हा पाकिस्तान्यांनी भारताच्या हृदयावर ओरखडा ओढलाय.. त्यामुळे आता युद्ध झाल्यास बलुचिस्तान, खैबर पख्तुनख्वा हे आणखी २ तुकडे होणार.. त्यामुळेच भारताच्या वाटेला गेलेल्या पाकचे ४ तुकडे झाल्याशिवाय राहणार नाहीत...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Death: पोलीस दलात आत्महत्येचं सत्र काही थांबेना! ४ दिवसात ३ आत्महत्या, काय आहे कारण?

Mahalaxmi Vrat 2025 : महालक्ष्मी व्रताची तारीख, पूजा विधी, महत्व घ्या जाणून

Maharashtra Live News Update: ते वक्तव्य करून अजित पवारांकडून मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न; राम शिंदेंचा आरोप

Gunfire Shooting : क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार! तिघांचा जागीच मृत्यू, आठजण जखमी

Astro Tips: सकाळी उठल्यावर आरशात पाहणे शुभ असते की अशुभ?

SCROLL FOR NEXT