Pakistan Political Crisis: Islamabad Sealed Amid Rumours Of Government Change saam tv
देश विदेश

बांगलादेश,नेपाळनंतर आणखी एका देशातील सरकार बदलणार? राजधानीची बॉर्डर कंटेनर्सनं सील

Pakistan Political Crisis: पाकिस्तानमध्ये सत्ताबदल किंवा तख्तापलट होण्याच्या शक्यतेबाबत चर्चा सुरू असून राजधानी इस्लामाबादमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पाकिस्तानातील राजकीय अनिश्चितता अधिकच वाढली आहे.

Bharat Jadhav

  • सत्ताबदलाच्या चर्चांमुळे इस्लामाबादमध्ये सुरक्षा कडक करण्यात आलीय.

  • राजधानीतील काही प्रमुख मार्गांवर कंटेनर्स लावून प्रवेश नियंत्रित केल्याची माहिती समोर

  • पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या सरकारवर राजकीय दबाव वाढत असल्याची चर्चा

भारताच्या शेजारील असलेल्या आणखी एका देशात सत्ताबदल होणार आहे. बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानमध्ये तख्तापलट होणार असल्याची चर्चा सुरू आहे. देशातील सत्ताबदला बाबतच्या हालचाली देखील सुरू झाल्या आहेत. राजधानी इस्लामाबादमध्ये तणाव निर्माण झाला असून मोठे कंटेनर्सनं बॉर्डर सील करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

या सत्ताबदलाची जबाबदारी लष्कर प्रमुख असीम मुनीर यांच्याकडे असल्याचं सांगितलं जातंय. पंतप्रधान शहबाज शरीफ यांची खुर्चीवर संकट घोंघावत आहे. या सरकारमधील गृहमंत्री मोहसिन नकवी यांनी सरकारविरुद्ध मोर्चा उघडला, असल्याचा दावा केला जातोय. इतकेचन नाही तर रावलपिंडीमध्ये सरकार कशी घालवायची या बाबतची ब्लूप्रिंट तयार करण्यात आलीय.

पाकिस्तानमधील शासन बदलणार असल्याचं विधान काही दिवसापूर्वी गृहमंत्री मोहसीन नकवी यांनी केलं होतं. देशातील सर्वात मोठा घोटाळा सर्वासमोर येणार आहे. एका माध्यमाशी बोलताना नकवी म्हणाले की, यात न्यायाधीशांपासून ते राजकारण्यांपर्यंत सरकारी यंत्रणेतील महत्त्वाचे घटक सामील आहेत. जर नकवी यांनी यात सहभागी असलेल्या व्यक्तींची नावे उद्याप उघड केली नाहीत, तरी त्यांच्या खळबळजनक विधानांच्या मालिकेमुळे पाकिस्तानातील सत्तेची सूत्रे बदलणार का, याबद्दलच्या चर्चांना उधाण आलंय.

नकवी यांचा स्कॅम बॉम्बनं सरकारमध्ये खळबळ

गृहमंत्री मोहसीन नकवी आणि पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांचे घनिष्ठ संबंध आहे. देशातील सर्वोत मोठ्या घोटाळ्यासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कारवाई झाली पाहिजे. नकवी यांनी पत्रकारांना सांगितले, की,"मला वाटत नाही की पाकिस्तानच्या इतिहासात न्यायाधीश, नोकरशाह, राजकारणी आणि बँकर यांचा समावेश असलेले इतक्या मोठ्या प्रमाणावरील हे पहिल्यांदा घडले असेल.

गेल्या २१ वर्षांपासून देशातील न्यायाधीश, नोकरशाह, राजकारणी आणि बँकर हे लाचखोरीच्या जाळ्यात अडकलेले आहेत, असा आरोप त्यांनी केला. पाकिस्तानची शासन व्यवस्था पूर्णपणे "कोलमडली" आहे, असे उघडपणे जाहीर करत त्यांनी शाहबाज सरकारच्या कामगिरीवर कठोर टीका केली आहे.

विश्लेषकांच्या मते, नकवी हे केवळ एक मंत्री नसून आसिम मुनीर यांचे एक प्यादे आहेत. त्यांना भविष्यातील एका महत्त्वपूर्ण राजकीय भूमिकेसाठी तयार केले जातंय. नकवी यांच्यावर आसिम मुनीर यांच्यासाठी मार्ग मोकळा करण्याची जबाबदारी सोपवण्यात आलीय. ज्याप्रमाणे परवेझ मुशर्रफ यांच्या काळात घडले होते, तसेच आता घडणार आहे. जेणेकरून मुनीर हे राष्ट्रपती आणि लष्करप्रमुख अशी दोन्ही पदे भूषवून सर्वशक्तिमान बनू शकतील. या घडामोडींमुळे नेत्यांची झोप उडालीय.

पंतप्रधान शहबाज यांच्या गोटात खळबळ

संरक्षण मंत्री आणि शाहबाज सरकारचे निष्ठावान सहकारी ख्वाजा आसिफ यांनी या अंतर्गत मतभेदांच्या पार्श्वभूमीवर जोरदार प्रत्युत्तर दिलंय. नकवी यांचे वर्णन 'पॉवरहाऊस' (अत्यंत प्रभावशाली व्यक्ती) असे करतानाच आसिफ यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलंय. नकवी स्वतःला पंतप्रधानांनाही उत्तरदायी मानत नाहीत आणि मंत्रिमंडळाच्या बैठकांनाही गैरहजर राहतात, असे आसिफ म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Khandeshwar Tourism : 'खांदेश्वर'जवळील 'ही' सुंदर पर्यटन स्थळे एकदा फिरा, पावसाळ्यात निसर्गाच्या प्रेमात पडाल

Snake Bite: सापाने दंश केल्यानंतर काय करावं?

राहुल गांधींकडून कार्यकर्त्यांचा विश्वासघात; काँग्रेसच्या महिला नेत्याचे गंभीर आरोप

Breastfeeding Mothers : बालकांना स्तनपान करणाऱ्या मातांसाठी या ५ गोष्टी नक्की कराव्यात, तज्ज्ञ डॉक्टरांनी नेमकं काय सांगितलं?

Maharashtra News Live Update: वसई-विरार महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयावर फेरीवाल्यांचा ठिय्या

SCROLL FOR NEXT