Pakistan army chief Asim Munir/DAWN
Pakistan army chief Asim Munir/DAWN saam tv
देश विदेश

Pakistan army chief : पाकिस्तानच्या नव्या लष्कर प्रमुखांची घोषणा, लेफ्टनंट जनरल असीम यांच्याकडे धुरा

Nandkumar Joshi

Pakistan army chief Asim Munir : पाकिस्तानच्या नव्या लष्कर प्रमुखांची घोषणा अखेर झाली. स्थानिक मीडियानुसार, लेफ्टनंट जनरल असीम मुनीर यांच्याकडे लष्कर प्रमुखपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. विद्यमान लष्कर प्रमुख कमर बाजवा हे २९ नोव्हेंबरला सेवानिवृत्त होणार आहेत. पाकिस्तानच्या सरकारनं आज गुरुवारी सकाळी नव्या लष्कर प्रमुखांच्या नावाची घोषणा केली. लेफ्टनंट जनरल असीम मुनीर हे पुढील लष्कर प्रमुख असतील, असे सांगण्यात आले.

पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी आपल्या संवैधानिक अधिकाराचा वापर करून लेफ्टनंट जनरल साहिर शमशाद मिर्झा यांची ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफ कमिटी (सीजेसीएससी) चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. सरकारने केलेल्या या नियुक्तीची शिफारस राष्ट्रपती आरिफ अल्वी यांच्याकडे पाठवण्यात येईल, असे पाकिस्तानचे मंत्री मरियम औरंगजेब यांनी सांगितले.

याआधी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी काल बुधवारी सांगितले की, पंतप्रधान शहबाज शरीफ शुक्रवारी तुर्कस्थानच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यापूर्वीच नवीन लष्कर प्रमुखांच्या नावाची घोषणा होईल, अशी अपेक्षा आहे. आसिफ यांच्या वक्तव्याच्या काही तास आधीच पंतप्रधान कार्यालयातूनही माहिती देण्यात आली होती. लष्कर प्रमुखपदासाठी सहा नावे आली होती.

जनरल कमर जावेद बाजवा २९ नोव्हेंबरला होणार सेवानिवृत्त

विद्यमान लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा हे पुढच्या आठवड्यात म्हणजेच २९ नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. जनरल बाजवा यांची २०१६ मध्ये तीन वर्षांसाठी लष्कर प्रमुख म्हणून नियुक्ती केली होती. २०१९ मध्ये त्यांना तीन वर्षांचा कालावधी वाढवून दिला होता.

कोणती सहा नावे होती शर्यतीत?

लेफ्टनंट जनरल असीम मुनीर (विद्यमान क्वार्टर मास्टर जनरल) यांच्या व्यतिरिक्त लेफ्टनंट जनरल साहिर शमशाद मिर्झा (कमांडर १० कोर), लेफ्टनंट जनरल अजहर अब्बास (चीफ ऑफ जनरल स्टाफ), लेफ्टनंट जनरल नोमान महमूद (राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठाचे अध्यक्ष), लेफ्टनंट जनरल फैज हामिद (कमांडर बहावलपूर कोर) आणि लेफ्टनंट जनरल मोहम्मद आमिर (कमांडर गुजरांवाला कोर) यांची नावे लष्कर प्रमुखपदासाठी चर्चेत होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Car Accident : शिक्षक आमदाराच्या भावावर दु:खाचा डोंगर; कारचा अपघात, कुटुंबातील सदस्यांसहित ६ ठार

Today's Marathi News Live :नाशिक मुंबई महामार्गावर भीषण अपघात; बलगर चालक केबिनमध्ये अडकल्याने होरपळून जागीच मृत्यू

Sambhajinagar News: संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, अजिंठा घाटात 66 प्रवासी घेऊन जाणारी बस उलटली

Lok Sabha Election 2024 : हुबेहुब आवाज, अॅक्शनही ; नरेंद्र मोदींचा मुखवटा घालून सांगलीतील सभांमध्ये दिसणारी व्यक्ती आहे तरी कोण?

Mint Water Benefits: उन्हाळ्यात रोज प्या पुदीन्याचं पाणी, आरोग्याला होतील फायदे

SCROLL FOR NEXT