Bilawal Bhutto Family Left Pakistan Saam Tv News
देश विदेश

Bilawal Bhutto : पाणी बंद केलं तर रक्ताच्या नद्या वाहतील; भारताला धमकी देणारा बिलावल भुट्टोनेच कुटुंबासह देश सोडला

Bilawal Bhutto Family Left Pakistan : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण आहे. मोठ्या नेत्याचं कुटुंबही देश सोडून पळून जात आहेत.

Prashant Patil

इस्लामाबाद : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने कारवाई केली आणि सिंधू पाणी करार रद्द केला आणि पाकिस्तानविरुद्ध इतर अनेक मोठी पावले उचलली. त्यानंतर पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि लोक भीतीच्या छायेत जगत आहेत. लोक देश सोडून पळून जाऊ लागले आहेत, यावरूनच या सर्वांचा अंदाज येतो. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांचे कुटुंब नुकतेच देश सोडून गेले होते आणि आता बातमी अशी आहे की पीपीपीचे (पाकिस्तान पिपल्स पार्टी) अध्यक्ष बिलावल भुट्टो यांचे कुटुंब पाकिस्तान सोडून कॅनडाला पळून गेलं आहे.

सिंधू पाणी करार स्थगित झाल्यानंतर, संतप्त बिलावलने धमकी दिली होती की जर पाकिस्तानचे पाणी थांबवले तर रक्ताच्या नद्या वाहतील. या धमकीच्या एका दिवसानंतर, आज रविवारी सकाळी त्यांच्या कुटुंबातील सदस्य बख्तावर भुट्टो आणि आसिफा भुट्टो पाकिस्तान सोडून कॅनडाला गेल्याची बातमी समोर आली आहे.

भारत कधीही हल्ला करू शकतो अशी भीती पाकिस्तानमध्ये आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या सैन्याचे मनोबलही घसरले आहे आणि अनेक अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबियांना परदेशात पाठवलं आहे. यामध्ये पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांचाही समावेश आहे. या लोकांनी त्यांच्या कुटुंबियांना खासगी जेटने ब्रिटन आणि न्यू-जर्सीला पाठवल्याचं वृत्त आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर लगेचच भारताने अरबी समुद्रातील आयएनएस सुरत येथून क्षेपणास्त्राची चाचणी करून पाकिस्तानला कडक संदेश दिला. त्याचवेळी, पंतप्रधान मोदींनी असंही म्हटलं की, दहशतवाद्यांविरुद्ध आणि त्यांच्या सूत्रधारांवर कठोर कारवाई केली जाईल आणि ते जगात कुठेही लपले असले तरी त्यांना शोधून काढलं जाईल.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात पाकिस्तानविरुद्ध संतापाची लाट आहे, आणि देशवासी पंतप्रधान मोदींकडून बदला घेण्याची मागणी करत आहेत. देशातील सर्व राजकीय पक्षही या मुद्द्यावर सरकारच्या पाठीशी उभे आहेत. सरकार कोणतेही पाऊल उचलेल तरी विरोधी पक्ष त्यांच्यासोबत असल्याचं विरोधी पक्षाचं म्हणणं आहे. सध्या, सरकारने सिंधू पाणी करार स्थगित केला आहे. पाकिस्तानी लोकांचे व्हिसा रद्द केले आहेत आणि त्यांना देशातून हाकलून लावलं आहे. तसेच, राजनैतिक संबंध मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी पत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

Shocking News : संतापजनक! राजकीय वाद टोकाला, महिला मध्यरात्री उठली अन्...

SCROLL FOR NEXT